Girish Mahajan, Gokul Gite,Uday Samant. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan: 'नाशिक'च्या निवडणुकीत 'संकटमोचका'ची झाली दमछाक; तटून राहिलेल्या गोकुळ गितेंच्या माघारीसाठी अख्खं सरकारच लागलं कामाला

Nashik MLC Election: नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नरेंद्र दराडे विजय होतील अशी स्थिती गुरुवारी(ता.11) निर्माण झाली. अपक्ष आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय अशी प्रतिमा असलेल्या गोकुळ गीते यांची माघार निश्चित झाली.

Sampat Devgire

Nashik News: एखादी निवडणूक पदरात पाडून घेण्यासाठी कोणत्या थराला जावे लागते याचा नमुना नाशिकमध्ये पाहायला मिळाला. महायुतीच्या नेत्यांचे आखे सरकार एका उमेदवाराच्या माघारी साठी कामाला लागले. यातून नरेंद्र दराडे यांची निवडणूक सोपी झाली.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नरेंद्र दराडे विजय होतील अशी स्थिती गुरुवारी(ता.11) निर्माण झाली. अपक्ष आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय अशी प्रतिमा असलेल्या गोकुळ गीते यांची माघार निश्चित झाली. ही माघार जाहीर करण्यासाठी महाजन यांना मुंबईहून नाशिकला यावे लागले. गोकुळ गीते यांच्या घरी सबंध कुटुंबियांची समजूत काढावी लागली.

गेले आठवडाभर चर्चेत असलेल्या अपक्ष गोकुळ गीते यांची माघार जाहीर करण्यासाठी तीन मंत्री आणि सबंध सरकार कामाला लागले. विशेषत: राज्याची सत्ता हाती असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच परीक्षा झाली. मात्र, खरी दमछाक झाली ती संकटमोचक म्हणवणाऱ्या गिरीश महाजन यांची.

नाशिक विधान परिषदेची निवडणूक सबंध राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यासाठी प्रयत्न करावे लागले. गिरीश महाजन यांसह तीन मंत्री त्यासाठी गेले चार दिवस झटत होते.

गोकुळ गीते हे आमचेच आहेत. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देतील. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समजूत काढली आहे असे गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी उमेदवार गीतेयांसह शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री उदय सामंत आणि अन्य नेते उपस्थित होते.

या निवडणुकीत संकटमोचक गिरीश महाजन यांचे अक्षरशा दमछाक झाली. अपक्ष उमेदवार गीते यांच्या नाक दूर्या काढण्यासाठी मुंबईत दिवसभर बैठकांचे सत्र झाले. त्यानंतर आज त्यांना नाशिकला यावे लागले.

यावेळी संतप्त गीते समर्थकांच्या नाराजीला आणि घोषणाबाजीला त्यांना सामोरे जावे लागले. यावेळी संकटमोचक महाजन यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, असे वर्तन कार्यकर्ते आणि वातावरणात होते. त्यामुळे एकंदरच नाशिक विधान परिषदेची निवडणूक आगामी काळासाठी महायुतीसाठी बरेच काही पेरून गेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT