Gore On Ranjitsinh Mohite Patil : जयकुमार गोरेंचे रणजितसिंह मोहिते पाटलांबाबत मोठं विधान : ‘मी काय त्यांचा शोध घेत नाही...’

Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील गट पुन्हा आमनेसामने आले असून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरील विधान चर्चेत आहे.
Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 June : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. बिनविरोधची अपेक्षा असलेल्या पालकमंत्री गोरेंसह भाजप नेत्यांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी चांगलेच पळविले आहे. भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी सोलापुरात आलेल्या गोरे यांनी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविषयी मोठे विधान केले आहे.

विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भेटीगाठी घेत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे हे राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी आले होते. गोरे यांनी सोलापुरातील नगरसेवकांशी संवाद साधला. त्यानंतर भाजपला महापालिकेतून शंभरपेक्षा जास्त मतदान होईल, असा दावा केला आहे. भाजपचे महापालिकेत ८७ सदस्य निवडून आले असून ८ सदस्य नियुक्त आहेत, त्यामुळे भाजपकडे ९५ सदस्य असताना गोरेंनी मात्र १०० पेक्षा जास्त मतांचा दावा केला आहे.

माध्यमांशी बोलताना गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. तसेच रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत भाष्य केले. माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील सध्या भाजपमध्ये कोठे आहेत? या प्रश्नावर ‘मी पालकमंत्री आहे. मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षात आहेत की नाहीत, हे मी शोधायला जात नाही. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि स्थानिक कार्यकर्ते सांगू शकतील. मी त्यांचा शोध घेत नाही,’ असे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
TMC MP Resign: तृणमूलचा आणखी एक खासदार गळाला! कोणी दिला रजीनामा? आता ममतांचे निष्ठावंत किती राहिले?

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे पोस्टमन आहेत की पालकमंत्री, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत गोरे म्हणाले, ‘मी कार्यकर्ता म्हणून राजकारणात आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना सरकार आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणे व त्यांची कामे करून घेणे हेच माझे काम आहे. त्याला पोस्टमनचे काम म्हणत असतील, तर त्यात वाईट वाटून घेण्याचे कारण नाही.

Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
Nashik MLC Election: गोकुळ गीते यांची माघार, भाव मात्र गिरीश महाजन यांचा वधारला

सेवा करताना पोस्टमनची भूमिका मिळाली तरी आनंदच आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना सामान्य कार्यकर्त्यांचे काम कसे समजेल, असा टोलाही गोरे यांनी मोहिते पाटील यांना लगावला. तसेच, विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com