Ganesh Gite, Narendra Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC : मतदारांचे डोळे दिपले; शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना आव्हान देणारा बंडखोर उमेदवार 100 कोटींचा मालक!

Nashik MLC Election Rebel Candidate Assets : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपली उमेदवारी मागे घेतली. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली. या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बंडखोरांनी दंड थोपटले आहेत.

Sampat Devgire

Nashik News, 03 Jun : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत नऊ प्रमुख उमेदवार आहेत. यातील महायुतीच्या बंडखोरांची संपत्ती पाहून निवडणुकीआधीच मतदारांचे डोळे दिपले. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्याच कारणाने चर्चेत येण्याची चिन्हे आहेत.

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपली उमेदवारी मागे घेतली. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली. या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बंडखोरांनी दंड थोपटले आहेत.

निवडणूक रिंगणात उतरलेल्या नऊ उमेदवारांपैकी प्रमुख उमेदवारांची संपत्ती डोळे दिपविणारी आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार नरेंद्र दराडे ९.४० कोटींचे मालक आहेत. मात्र त्यांच्या विरोधात फसवणूक आणि आमदार नसताना पदाचा दुरुपयोग केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी डमी अर्ज दाखल केला आहे.

दराडे बंधू यांची मातोश्री व अन्य व्यावसायिक शिक्षण संस्था आहेत. कुणाल दराडे हे वडिलांपेक्षाही अधिक श्रीमंत असून त्यांच्याकडे २१.०८ कोटींची संपत्ती आहे. या निवडणुकीत दोन वेळा महापालिका स्थायी समितीचे सभापती असलेले भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांचे शिवसेना उमेदवार दराडे यांच्यापुढे मुख्य आव्हान आहे. त्यामुळेच ही निवडणूक अधिक चर्चेत आहे.

बंडखोर व अपक्ष उमेदवार गणेश गीते यांची संपत्ती मतदारांचे डोळे दिपविणारी आहे. शासकीय कंत्राटदार आणि व्यवसायिक असलेल्या गणेश गीते यांच्याकडून ९९.६३ कोटींची स्थावर तर ५१.३१ कोटीची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर ९५.४६ कोटिंग चेक कर्ज आहे. म्हाडा जमीन घोटाळा प्रकरणात ते आरोपी आहेत.

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांची संपत्ती देखील चर्चेत आहे. त्यांच्याकडे हिरे आणि पाच किलो सोने यांसह विविध मालमत्ता आहेत.१०८ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असलेल्या कोकणी यांच्या विरोधात कोणताही गुन्हा नाही. आयकर विभागाचे एक कोटींचे देणे त्यांच्याकडे आहे.

नाशिक विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये भाजपचे दोघे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विष्णुपंत म्हैसधुणे आणि गोरख बोडके हे बंडखोर उमेदवार आहेत. त्यांनीही आपल्या संपत्तीचे विवरण पत्र दाखल केले आहे. या दोन्ही उमेदवारांना आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईला चर्चेसाठी बोलविले आहे. त्यामुळे बंडखोरांना माघारी साठी वरिष्ठांकडून सूचना देण्याचे काम आजपासून सुरू होण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT