Surat Bus Accident : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसचा अपघात, पाण्याच्या टँकरने केला घात, 7 जणांचा होरपळून मृत्यू

Maharashtra ST bus accident in Gujarat : सुरतच्या ग्रामीण पोलिसांनी सांगितलं की, 'राष्ट्रीय महामार्ग ५६ वर, बारडोलीकडून व्याराकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र पासिंग असलेल्या दोन प्रवासी बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे एका बसला आग लागली, तर दुसऱ्या बसमधील प्रवासी जखमी झाले.
Surat Bus Accident | ST Bus Crash | 7 Dead
Surat Bus Accident | ST Bus Crash | 7 DeadSarkarnama
Published on
Updated on

Surat Bus Accident : गुजरातमधील सुरतमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ हून अधिक प्रवासी जखमी आहेत. मृतांपैकी फक्त एका ड्रायव्हरची ओळख पटू शकली आहे. इतर ६ जणांची अद्यापही ओळख पटली नसल्याची माहिती समोर आली आहे.

तर सुरतहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसला पाण्याच्या टँकरची धडक लागल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. टँकरच्या धडकेमुळे अनियंत्रित झालेल्या जळगाव-सुरत बसची पलीकडील मार्गावरून येणाऱ्या बसला जोरात धडक लागली. यामुळे हा भीषण अपघात झाला. तर ही धडक इतकी भयानक होती की धुळे-सुरत बस दोनवेळा उलटली आणि तिने पेट घेतला.

अचानक बसने पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. शिवाय त्यांना बाहेर देखील काढता आलं नाही. त्यामुळे या बसमधील ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केलं.

Surat Bus Accident | ST Bus Crash | 7 Dead
Gokul Milk News: ना चौकशी, ना नोटीस; गोकुळच्या 427 संस्थांना अपात्र ठरवल्याने संताप, संस्था चालक न्यायालयात जाणार

सुरतच्या ग्रामीण पोलिसांनी सांगितलं की, 'राष्ट्रीय महामार्ग ५६ वर, बारडोलीकडून व्याराकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र पासिंग असलेल्या दोन प्रवासी बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे एका बसला आग लागली, तर दुसऱ्या बसमधील प्रवासी जखमी झाले.

Surat Bus Accident | ST Bus Crash | 7 Dead
Gokul Milk Union Politics: गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट! अरुण डोंगळे, सतेज पाटलांचं ठरलं; अपात्र संस्थेवरून घेतला निर्णय

यात सात जणांचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत. जखमींना बारडोली येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर अपघात कसा झाला हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, रस्त्यावरून पुढे एक पाण्याचा टँकर जात होता. त्यावेळी टँकरला एक बस मागून धडकल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस डिव्हायडर ओलांडून पलीकडे गेली आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बसला समोरासमोर धडकल्यामुळे हा अपघात घडला.'

दरम्यान, या बस अपघाताच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. मोदींनी म्हटलं की, 'गुजरातच्या सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.' तसंच पंतप्रधानांनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदतीची घोषणा देखील केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com