Kishore Darade News: नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवामुळे शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपच्या मंत्र्यांवर देखील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोरच यावेळी आरोप करण्यात आले.
विधान परिषद निवडणुकीत अपक्ष गोकुळ गीते विजयी झाले. त्यांना ३५७ मते मिळाली. मतदानाच्या दिवशी भाजपचे गणेश गीते आणि अपक्ष गोकुळ गीते यांनी मतदान केंद्रावर आम्हाला मतदान करू नका असे जाहीर आवाहन केले होते. त्यानंतर त्यांना एवढे मतदान होऊन ते विजयी झाले. त्यामुळे या निवडणुकीचे कवित्व नव्याने सुरू झाले आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे, त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांसह सबंध कुटुंबाने महायुतीच्या नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले. तिन्ही मंत्री आणि सर्व स्थानिक नेत्यांनी विश्वासघात केला असा थेट आरोप झाला. त्यामुळे भाजपच्या गिरीश महाजन यांच्यापासून तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत अनेकांना त्याचा खुलासा करावा लागला.
आमदार किशोर दराडे यांनी यासंदर्भात प्रसार माध्यमांना धक्कादायक माहिती दिली. या निवडणुकीत १८ कोटी रुपये घेऊन गद्दारी झाली. सोबत राहुन आणि विश्वास दाखवून आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा खेळ करण्यात आला, असे ते म्हणाले.
आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषद निवडणुकीत थेट १८ कोटी रुपयांचा उल्लेख केला. त्यामुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. या पैशांचा लवकरच सर्व हिशेब मांडणार असल्याचे देखील ते म्हणाले.
आमदार दराडे यांनी आपल्या विरोधात कसे कारस्थान रचण्यात आले याची झलक देखील सांगितली. जे नगरसेवकांनी मतदान ठाणे येथे सहलीला गेले होते. त्यामध्ये अपक्ष उमेदवार गीते यांचे लोक देखील होते. त्यांनीच ठाणे येथे सर्व खेळ केला, असा आमदार दराडे यांचा आरोप आहे.
भाजपचे २०० मतदार होते. मग हे मतदान गेले कुठे?. या संदर्भात सर्व मंत्र्यांनी आमच्याशी प्रामाणिक राहण्याचे नाटक केले. गिते यांना माघार घेण्यासाठी केलेला खेळ म्हणजे आमची निवडणूक उभे राहू नये, हा डाव होता, असा धक्कादायक आरोप देखील दराडे यांनी केला आहे.
दराडे यांच्याकडून पराभवानंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. हे प्रामुख्याने थेट १८ कोटी रुपयांचा उल्लेख झाला आहे. याबाबतचा सर्व हिशेब आणि काय काय व्यवहार झाले हे सर्व मांडणार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला. विजयी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या दराडे यांचा पराभव करून पुन्हा त्याच पक्षात प्रवेश केला आहे. त्यावरून सुरू झालेले वादविवाद आणि राजकारण याचे कमीत्व आणखी काही दिवस सुरूच राहील अशी चिन्हे आहेत.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.