Nashik MLC Election : किशोर दराडे थेट गितेंच्या घरात, बंद दाराआड तासभर चर्चा.. ; बाहेर आल्यावर सगळं सांगितलं..

Kishor Darade's Visit to Ganesh Gite's Residence : महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हे गणेश गिते यांच्या घरी भेटीसाठी दाखल झाले. तासभर त्यांच्याच चर्चा झाली. बाहेर आल्यावर दराडेंनी माध्यमांशी संवाद साधला..
Kishor Darade's Visit to Ganesh Gite's Residence
Kishor Darade's Visit to Ganesh Gite's ResidenceSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याविरोधात भाजपच्या प्रसाद हिरे व गोकुळ गिते या दोघांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले होते. त्यापैकी प्रसाद हिरे यांनी सोमवारी माघार घेत महायुतीला पाठिंबा जाहीर केला. परंतु अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने तिढा वाढला आहे.

त्यातच मंगळवारी (दि. ९) महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी थेट अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचे मोठे बंधू भाजपचे नेते गणेश गिते यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुतीचे नेते व दराडे परिवाराकडून सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर किशोर दराडे हे गणेश गिते यांच्या घरी गेल्याचे बोललं जात आहे.

गणेश गिते व किशोर दराडे या दोघांमध्ये साधारण तासाभर बंद दाराआड चर्चा सुरू होती. यानंतर बाहेर आल्यावर किशोर दराडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'दिपालीताई' (गणेश गिते यांच्या पत्नी) या आमच्या मतदार आहेत. मी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी त्यांच्याकडे मत मागण्यासाठी आलो होतो. त्यांनी मला त्या युतीचा धर्म पाळणार असून महायुतीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याचे दराडे म्हणाले.

Kishor Darade's Visit to Ganesh Gite's Residence
Nashik MLC Election : महाजन-सामंत यांच्यात का रे दुरावा? गोकुळ गितेंची समजूत काढायला आले पण दोघे एकमेकांना भेटले सुद्धा नाही
Kishor Darade's Visit to Ganesh Gite's Residence
Nashik MLC Election : गोकुळ गितेंनी शड्डू ठोकल्यानं नाशिक विधानपरिषदेचं गणित बदललं; निवडणुकीतून माघार घेणाऱ्या मविआचे महत्व वाढले

गोकुळ गिते यांना फोनवर माघारीची विनंती करताना 'तू कुठे म्हातारा झाला' असं आपण म्हणाले होता, त्यावर विचारले असता स्पष्टीकरण देताना किशोर दराडे म्हणाले, 'मराठी भाषा ही जशी वाकवू तशी वाकते. आपण सहज पोरांना म्हणतो तूझं कुठं वय झालंय का..होईल पुढे मिळेल..तसे मी ते सहज बोललो होतो, आमचे ट्युनिंग तसे आहे. पण कोणीतरी अनवधानाने ते व्हायरल केले. यात गोकुळ गिते यांचा काहीही संबंध नाही.

दरम्यान कुणाल दराडे यांचे कथित बाप काढल्याचे वक्तव्य व संबधित ऑडियो क्लीपवर विचारले असता, ते म्हणाले.. राजकारणात कोणीतरी विरोधक असतात, हा आपसात लावून देण्याचा प्रकार आहे. माझा पुतण्या असं काहीही बोलला नाही. माझा पुतण्या सुशिक्षित असून ग्रॅज्युएट झालेला आहे, तो असे काहीही बोललेला नाही. त्याने माध्यमांना आधीच स्पष्ट केले आहे की, ती क्लिप फॉरेन्सिक लॅबला पाठवा. जर तो माझा आवाज असेल आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल, तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे असे त्याने आधीच कळवलं आहे असं दराडे म्हणाले.

दरम्यान तुम्ही आता भेटीसाठी आलात आधी आला असता तर मनधरणीला यश आलं असतं..यासंदर्भात विचारले असता दराडे म्हणाले, हे खरंय की आधी यायला हवे होते. पंरतुगणेश भाऊ देखील निवडणुकीच्या स्पर्धेत होते. ते सुद्दा उमेदवारी मागत होते. ही जागा भाजपला जाणार की शिवसेनेला, हे आधी स्पष्ट नव्हते. आता नियमाने ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली असल्याने आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे.

Kishor Darade's Visit to Ganesh Gite's Residence
Nashik MLC Election : गोकुळ गितेंनी शड्डू ठोकल्यानं नाशिक विधानपरिषदेचं गणित बदललं; निवडणुकीतून माघार घेणाऱ्या मविआचे महत्व वाढले

मी मतदान मागण्यासाठी आलो आहे. दीपाली ताई शंभर टक्के महायुतीचा धर्म पाळत नरेंद्र दराडेंना मतदान करतील. मी गोकुळ भाऊंना देखील भेटणार आहे. त्यांनाही मदत करा म्हणून विनंती करणार असल्याचं दराडे म्हणाले.

यावेळी त्यांना एका अपक्ष उमेदवाराच्या माघारीसाठी जिल्ह्यात तीन-तीन मंत्र्यांच्या सुरु असलेल्या बैठकांवर आणि वाढत्या सक्रियतेबद्दल विचारण्यात आले असता उमेदवार हा महायुतीचा आहे. नाशिक जिल्ह्यातच नाही, तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंत्री फिरत आहेत. यात कोणतेही आव्हान नसून युतीचे काम करणे ही मंत्र्यांची जबाबदारीच आहे, असे किशोर दराडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com