Raj Thackerey & Salim Shaikh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray Politics: मतपेटीत हरला, जनतेत भारी! मेळाव्याला तुफान गर्दी ठाकरेंच्या शिलेदाराचा इशारा- ‘खरा नगरसेवक मीच!’

Salim Sheikh Challenges EVM & Voting Process: मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांनी पराभवानंतरही केले मोठे शक्ती प्रदर्शन.

Sampat Devgire

Salim Shaikh Election Loss Reaction: महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे यांनी युती केली होती. मात्र या युतीला नाशिकमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. विशेषता मनसेच्या नेत्यांना त्याचा मोठा धक्का बसला.

महापालिका निवडणुकीत मनसे पक्षाचा अवघी एक जागा मिळाली. सातपूर परिसरातील राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सलीम शेख यांचा पराभव झाला. माजी नगरसेवक सलीम शेख यांचा पराभव अनेकांना जिव्हारी लागला आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर माजी नगरसेवक सलीम शेख यांनी प्रभागातील नागरिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. श्री शेख यांना मात्र प्रत्यक्षात तेवढी मते मिळाली नव्हती. त्यामुळे या मेळाव्याची चर्चा आहे.

माजी नगरसेवक शेख यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केला. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार राजरोसपणे गैरप्रकार करीत होते. मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी यंत्रणा कुठेही दिसली नाही, अशी टीका शेख यांनी केली.

भाजपच्या नगरसेवकांना "ईव्हीएम नगरसेवक" असे त्यांनी संबोधले. निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी यापुढेही आपण समाजकारणात सक्रिय राहणार आहोत. या मेळाव्याला जमलेले नागरिक म्हणजे मीच खरा जनतेचा नगरसेवक असा संदेश आहे.

या मेळाव्याला अन्य उमेदवार गीता जाधव, रोहिणी लहारे, फरीदा शेख आणि विशाल धावले हे देखील उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण नागरे संजय जाधव सोपान शहाणे यांनीही या मेळाव्याला उपस्थिती लावली. या उमेदवारांनी निकाल आणि निवडून आलेले उमेदवार व त्यांचे मतदान याविषयी आश्चर्य व्यक्त केले.

ज्यांना प्रभागात कोणी पाहिले नाही मतदारांसमोर जे कधी गेले नाही जनतेच्या कामात कुठेही दिसले नाही असे लोक निवडून कसे येतात असा प्रश्न त्यांनी केला ते म्हणाले सातपूर सह संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्यांना आता ईव्हीएम नगरसेवक असेच म्हटले जाईल कारण हे लोक खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातले नगरसेवक नाहीत हे मेळाव्यावरून स्पष्ट होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील एकूणच निवडणुकीच्या प्रक्रिया विषयी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र राज ठाकरे हे विरोधक असल्याने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजही सर्व विरोधक एकत्र आले असते तर राजकीय चित्र नक्कीच वेगळे दिसले असते, असा दावा माजी नगरसेवक शेख यांनी केला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही माजी नगरसेवक सलीम शेख यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून उल्लेख केला आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या असूनही परिसरातील सर्व समाजांमध्ये श्री शेख हे अत्यंत लोकप्रिय आहेत. यापूर्वी तीन वेळा ते नगरसेवक राहिले आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी शेख यांच्या पराभवावर नाराजी व्यक्त केल्याने हा मेळावा चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT