Girish Mahajan, Eknath Shinde, Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC : गिरीश महाजनांनी एकाच शब्दात विषय संपवला, शिवसेना-राष्ट्रवादीला नाशिकमध्ये सत्तेत सहभाग देण्यास नकार

Girish Mahajan On Nashik Municipal Corporation : गेल्याकाही दिवसांपासून शिवसेना-राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर घमासान सुरु होतं.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिकेत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करुन घेण्यासाठी स्थानिक पातळीवर गेल्याकाही दिवसांपासून खलबते सुरु होते. भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी दोन्ही पक्षांना सत्तेत सहभागी करुन घेण्याची तयारी दर्शवली होती. पण मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेत भाजपला 'कुबड्यांची गरज नाही' असे स्पष्ट सांगितले आहे.

कुबड्यांची गरज नाही या शब्दातूनच त्यांनी शिवसेना- राष्ट्रवादीला नाशिकमध्ये सत्तेत सहभाग देण्यास नकार स्पष्टपणे नकार दर्शवला आहे. ज्या महापालिकांमध्ये आम्ही तीन्ही पक्ष महायुती म्हणून लढलो तिथे घटक पक्षांना आम्ही सत्तेत सहभागी करुन घेतले. हे सांगताना त्यांनी जळगावचे उदाहरण दिले. म्हणाले, जळगावला आम्‍ही युती म्‍हणून लढतो, तिथे त्‍यांचे कमी नगरसेवक असतानादेखील सत्तेत सहभागी करून घेत आहोत.

परंतु नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असून, नंतर एकत्र येण्याचा प्रश्‍नच येत नाही. भाजपने ७२ जागांवर नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे भाजपला नाशिकमध्ये कुबड्यांची गरज नाही. शिवसेना, राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा कुठलाही प्रस्‍ताव प्राप्त झाला नाही किंवा आम्ही कुणालाही प्रस्ताव दिलेला नाही असं सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांच्या दाव्याची हवाच काढून घेतली.

नाशिकमध्ये भाजप पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत महाजन बोलत होते. ज्‍या महापालिकांमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढविली आहे, तेथेच मित्रपक्षांना सत्तेत भागीदार करून घेणार आहोत. नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शिवाय भाजपने स्वबळावर निवडणूक लढवलेली आहे. त्‍यामुळे महापौर, स्‍थायी समितीसह अन्‍य विविध महत्त्वाच्‍या पदांवर भाजपचाच दावा राहणार असल्‍याचे गिरीश महाजन यांनी ठणकावून सांगितले. नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी असल्‍याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान महापौरपदाचा निर्णय देखील मुंबईत घेतला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबईत जाऊन आपण त्यासंदर्भात चर्चा करणार आहोत. त्यानंतर कुणाला संधी द्यायची ते ठरवले जाईल. ज्या नावावर एकमत होईल त्या नावाची घोषणा केली जाईल असे महाजन यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT