Nashik NMC BJP Shiv Sena controversy: नाशिक महापालिकेत भक्कम बहुमत असतानाही भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेत सहभागी केले. मात्र महापालिकेचा कारभार हकताना भाजपची कोंडी होऊ लागली आहे. भ्रष्टाचाराचे प्रकरण भाजपला अडचणीचे ठरण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवकच भाजपची कोंडी करत आहेत.
महापालिकेच्या जागा बीओटी तत्त्वावर देण्यापासून तर खरेदीतील भ्रष्टाचार चक्क भाजपचा मित्रपक्षकाडून उघड करण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेची महासभा सातत्याने सहकारी पक्षांच्या आरोपांनीच गाजते आहे. मंगळवारी झालेली महासभा देखील त्याला अपवाद ठरली नाही. या महासभेत सत्ताधारी भाजपच्या महापौरांना विरोधी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाबरोबरच सहकारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने चांगलेच अडचणीत आणले.
महासभा सुरू होण्याआधीच नगरसेवकांनी जोरदार आंदोलन केल्याने तो चर्चेचा विषया ठरला. उद्यान विभागातील खेळणी आणि बाकडे खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे कैलास मुदलियार यांनी मांडले. निविदा प्रक्रियेतील घोटाळा उघड झाल्याचा गंभीर दावा केला.
विविध प्रक्रियेत एकाच कंत्राटदाराने विविध नावांनी निविदा भरल्या. यात ११ हजारांचा बाकडा चक्क २१ हजारांना खरेदी झाला. त्याचे प्रदर्शनात सभागृहाच्या प्रवेशद्वारावर मांडण्यात आले होते. दुसरीकडे पंचवटी आणि अंबड भागात चक्क पिवळ्या रंगाचे घातक पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. नगरसेवकांनी प्रशासनाच्या या कारभाऱ्याचा पंचनामा केला. त्यामुळे महापौर हिमगौरी अडके यांनी दहा दिवसात याबाबत लिखित स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.
महापालिकेच्या विविध सार्वजनिक जागा आणि उद्याने खाजगी संस्था आणि व्यक्तींना बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजपला या प्रश्नावर चांगलेच अडचणीत आणले. गटनेते केशव पोरजे आणि महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांसह सर्व नगरसेवकांनी सभेत त्यावर फलक झळकावीत गंभीर आरोप केले. त्यामुळे महासभेत भाजपला सहकारी आणि विरोधक दोघांनी चांगलेच अडचणीत आणले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.