Beed Collector : बघू, आज काय आहे जेवणात? मलाही ताट वाढा,बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन विद्यार्थ्यांसोबत रमले

Vivek Johnson Surprise Visit : शालेय पोषण आहारात कोणतीही कमतरता आढळली तर गाठ माझ्याशी आहे, असा कडक इशारा आठवड्याभरापूर्वी महिला व बालविकास विभागाच्या बैठकीत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी दिला होता.
Beed Collector Vivek Jonson
Beed Collector Vivek Jonson Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed News: शालेय पोषण आहारात कोणतीही कमतरता आढळली तर गाठ माझ्याशी आहे, असा कडक इशारा आठवड्याभरापूर्वी महिला व बालविकास विभागाच्या बैठकीत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी दिला होता. त्यानंतर आज ते थेट एका शाळेत पोहचले. तिथे पोषण आहार घेत जमीनीवर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पंगतीत जाऊन बसले.

मलाही एक ताट वाढा म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेत पोषण आहाराची गुणवत्ताही तपासली. कलेक्टर आपल्या पंगतील येऊन बसलेले पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन मंगळवारी (ता. ६) थेट मैदानात उतरले.

दुष्काळी पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला अचानक भेट दिली. विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार कसा आहे, हे पाहण्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या रांगेत बसले. त्यांच्यासोबत गप्पा मारतानाच त्यांनी जेवणही केले.

दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी शाळेत पोहोचले, तेव्हा चिमुकले विद्यार्थी मध्यान्ह भोजनासाठी रांगेत बसले होते. कसलाही बडेजाव किंवा लवाजमा न घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ताट हातात घेतले आणि ते थेट विद्यार्थ्यांच्या शेजारी जमिनीवर रांगेत बसले. राज्याच्या प्रशासनाचा प्रमुख आपल्या शेजारी बसून जेवत असल्याचे पाहून सुरुवातीला लहानगे अवाक झाले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत आपुलकीने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

Beed Collector Vivek Jonson
Pune Bjp News: पुण्यातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांची जबाबदारी चंद्रकांतदादांवर; 4 मंत्र्यांचीही साथ, शरद लाडांच्या तयारीचा फायदा घेणार

जेवणाचा आस्वाद घेत त्यांनी पोषण भोजनाच्या दर्जाची प्रत्यक्ष पडताळणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या अभ्यासाबाबत, आवडीनिवडी आणि भविष्यातील स्वप्नांबाबत गप्पा मारल्या. शिक्षणाच्या बळावर आत्मविश्वासाने पुढे जा, असा प्रेरणादायी मंत्र देत त्यांनी चिमुकल्यांना प्रोत्साहित केले. ​विवेक जॉन्सन यांच्या या सरप्राइज स्टिंग'चे कौतुक होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com