Raj-Thackeray-Eknath-Shinde-Uddhav-Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray Politics: राजकीय दोलायमान मनसे! ठाकरेंवर विसंबलेली, पण शिंदेंना दाद दिली अन् अस्तित्वच...!

Nashik Municipal Corporation MNS Raj Thackeray corporator Mayuri Pawar in Eknath Shinde group -नाशिक महापालिकेत मयुरी पवार या मनसेच्या एकमेव नगरसेविका निवडून आलेल्या आहेत.

Sampat Devgire

NMC Raj Thackeray News: नाशिक महापालिकेत विविध नगरसेवकांनी आपली गट नोंदणी केली आहे. यात सत्तेत वाटा मिळविण्याचा हेतू ठेवून अनेक तडजोडी झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेत निवडून आलेल्यांनी सत्तेसाठी थेट पक्षाशीच तडजोड केली, असे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीसाठी नाशिकमध्ये ठाकरे बंधू सर्वप्रथम एकत्र आले होते. त्याचे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले होते. विशेषता राज ठाकरे यांच्या भूमिकेला स्थानिक कार्यकर्त्यांनी जोरदार पाठिंबा दिला होता.

महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेची युती झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बरोबर घेत महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. महापालिका निवडणुकीत मयुरी पवार या मनसेच्या एकमेव नगरसेविका निवडून आल्या होत्या.

महापौर, उपमहापौर स्थायी समिती सदस्य यासाठीच्या संख्याबळाची जमवाजमव सध्या सुरू आहे. अनेक पक्षांनी निवडणूक पूर्व आघाडीला तिलांजली देत नवीन पक्षांशी हात मिळवणी केली. त्यामुळे महापालिकेतील संख्याबळाला नगरसेवकांनी सर्वाधिक महत्त्व दिल्याचे चित्र आहे.

मनसेच्या मयुरी पवार या शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोबत युती करून विजयी झाल्या. मात्र महापालिकेत गट नोंदणी करताना त्यांनी चक्क शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाशी संधान बांधले आहे. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंद पक्षात गटनोंदणी केली. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे गटनेते हेच या गटाचे नेतृत्व करणार आहेत. एकमेव नगरसेविका असूनही महापालिकेत मनसेचे अस्तित्व मात्र संपुष्टात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची ही अशीच ओढाताण झालेली दिसते. या पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र गट नोंदणी करताना डॉक्टर हेमलता पाटील यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार गटाचे तीन नगरसेवक असलेला गट अस्तित्वात आला आहे.

काँग्रेसचे महापालिकेतील नगरसेवक आहेत. या तिन्ही नगरसेवकांनी महाविकास आघाडीचा घटक म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत आपली नोंदणी केली. त्यामुळे या पक्षाने यापूर्वी सोफी जीन यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. आता केशव पोरजे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते आहेत. उपस्थितीत काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व राहणार की नाही हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिका स्थायी समिती समिती सदस्यांच्या निवडणुक डोळ्यापुढे ठेवून या नगरसेवकांनी गट नोंदणी केली आहे. स्थायी समितीच्या सत्तेला त्यामुळे अचानक मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या सत्तेसाठी नगरसेवकांनी आपल्या पक्षाशी ही तडजोड करण्यास मागे पुढे पाहिले नाही.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT