Eknath Shinde Politics: उपमहापौरपदावरून मोठा गेम! तिदमे बाहेर, नाशिक शिंदेसेनेत ‘इनसाईड पॉलिटिक्स’चा स्फोट

Nashik Shisvena Eknath Shinde Municipal Corporation Deputy Mayor controversy Bunty Tidme gave a direct warning-शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्या भूमिकेने शिंदेंच्या शिवसेनेत पडली वादाची ठिणगी.
Eknath shinde & Pravin Tidme
Eknath shinde & Pravin TidmeSarkarnama
Published on
Updated on

Bunty Tidme News: भाजपने नाशिक महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सत्तेत सहभागी केले. त्या बदल्यात पक्षाला उपमहापौर पद मिळाले आहे. मात्र हे पदच आता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये वादाचा विषय बनले आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या विलास शिंदे यांना उपमहापौर पदाची संधी देण्यात आली. ऐनवेळी हा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्यासाठी कोणालाही विश्वासात घेण्यात आले नव्हते त्याचे तीव्र राजकीय पडसाद पक्षात उमटले आहे.

विलास शिंदे यांना शिवसेनेतर्फे उपमहापौरपदाची संधी मिळाली. त्यामुळे पक्षाचे महानगर प्रमुख बंटी तिदमे चांगलेच नाराज झाले आहेत. नगरसेवक तिदमे यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाने त्यांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी जाहीरपणे प्रकट केली आहे.

Eknath shinde & Pravin Tidme
Jalgaon Crime News : रात्रीचा थरार ! जळगाव जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षकाचे घर जाळण्याचा प्रयत्न, थरारक दृश्य CCTV मध्ये कैद

बंटी तिदमे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत स्थानिक पदाधिकाऱ्यांविरुद्ध आगपाखड केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याने आपण तुर्त माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगताना स्थानिक गटनेते आणि उपमहापौर यांच्यावर त्यांनी शरसंधान केले.

Eknath shinde & Pravin Tidme
Devendra Fadnavis Nashik : भाजपला स्पष्ट बहुमत दिलं, आता नाशिकच्या विकासासाठी फडणवीसांचा मोठा शब्द

बंटी उर्फ तिदमे यांच्या समर्थकांनी पक्षातील हा वाद वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जोरदार फील्डिंग लावली होती. पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांसह विविध पदाधिकाऱ्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात आणि निकालात व्यस्त होते. या व्यस्ततेमुळे त्यांना या वादाकडे लक्ष देता आले नव्हते.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी परस्परांविरोधात टोकाची भूमिका घेतल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. हा वाद मिटविणे स्थानिक नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या क्षमतेबाहेर आहे. त्यामुळे महापालिकेच्या सत्तेत सहभागी होताच एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादाला तोंड फुटले आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या सर्व नगरसेवकांची बैठक होणार आहे. या बैठकीत नगरसेवकांची मते जाणून घेतली जाते. याच वेळी स्वतंत्रपणे चर्चा करून आम्ही आमची भूमिका मांडू असे महानगर प्रमुख तिदमे यांनी सांगितले.

या संदर्भात श्री तिदमे यांनी उपमहापौर पद सव्वा वर्षासाठी आपल्याला मिळावे अशी भूमिका मांडली आहे. यानिमित्ताने नाशिकच्या नगरसेवकांनी थेट पक्षाच्या नेत्यांनाच टर्म डिक्टेट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद कोणत्या थराला जातो, हा चर्चेचा विषय बनला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com