Congress UBT Nominated Corporators seat-sharing dispute Nashik NMC : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला झालेल्या दिरंगाईविरोधात काँग्रेसचे गटनेते सुफी जीन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यावर महापालिकेला खडेबोल सुनावले व निवड प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले. मात्र, आता दिरंगाईविरोधात कोर्टात गेलेल्या कॉंग्रेसमध्येच उमेदवार निश्चितीवरुन गृहयुद्ध रंगले आहे.
भाजपमध्ये स्वीकृतसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवार निश्चित करण्याचे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळेच यापूर्वी निवड प्रक्रिया रखडल्याचे बोलले जात होते. मात्र, कॉंग्रेसने न्यायालयात धाव घेतल्याने भाजपची कोंडी झाली.
मात्र, आता नाव निश्चित करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. २१ ऑक्टोबरपर्यंत आयुक्तांना नावे कळवायची आहेत. दोन दिवस उरली असतानाही कॉंग्रेस व उद्दव सेनेतील रस्सीखेच सुरुच असून तिढा सुटलेला नाही.
स्वीकृत नगरसेवक पदाच्या वाटपावरुन कॉंग्रेस व उद्धव सेनेत मतभेद निर्माण झाले आहेत. दोन्ही जागांवर ठाकरे सेनेने दावा केला आहे. मात्र, कॉंग्रेसला एक जागा हवी आहे. स्वीकृत नगरसेवक पदाऐवजी कॉंगेसला दोन वर्ष स्थायी समितीमध्ये सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव उबाठाकडून मांडण्यात आल्याचे समजते. परंतु हा प्रस्ताव अमान्य करत स्वीकृत नगरसेवक पद मिळावे अशी ठाम भूमिका कॉंग्रेसने घेतल्याने तिढा वाढला आहे.
दरम्यान, कॉंग्रेसमध्येही संभाव्य नावाविरोधात पक्षांतर्गत नवा वाद सुरू झाला असून गटनेता विरुद्ध इतर नेते अशा बैठकांना जोर आला आहे. काँग्रेसचे गटनेते सुफी जीन यांनी उद्धवसेनेचे संजय चव्हाण यांच्या नावाचा आग्रह धरल्याचे कथितरित्या सांगितले जात आहे. सुफी जीन यांच्या या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुफी यांनी आपण घेऊ तीच सभागृहातील भूमिका असे स्पष्ट केले आहे. त्यातून काँग्रेसमध्येच फूट पडल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे गट नोंदणीवेळी काँग्रेसने स्वीकृतची जागा उद्धवसेनेला देण्याचे मान्य केले होते असा दावा उद्धवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी केला आहे. कॉंग्रेसला दोन वर्ष स्थायी समितीत्यांवर नियुक्ती व दोन समित्यांवर नियुक्ती असा प्रस्ताव पोरजे यांनी दिला आहे. तर कॉंग्रेस गटनेते सुफी जीन स्वीकृतनगरसेवक पद मिळावे यावर ठाम असल्याने गुंता वाढला आहे.
दरम्यान हा वाद न मिटल्यास ते भाजपच्या पथ्यावर पडले असे दिसत आहे. सुफी जीन यांनी काँग्रेसचा उद्धव सेनेतील गट बाहेर काढून घेतल्यास तिढा निर्माण होईल. हेच तांत्रिक कारण न्यायालयात सादर करून भाजप नियुक्ती प्रक्रिया लांबवण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.