Sinhastha Kumbh Mela : शतकातील मोठा बदल : कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या ऐतिहासिक मार्ग बदलास साधुंनी दाखविली तयारी

Mahant Shankaranand Saraswati Kumbh Mela Meeting: सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण अवघ्या काही दिवसांवर आले आहे. अशातच प्रशासनाची विकास कामे व नियोजनाच्या पूर्ततेसाठी धावपळ उडाली आहे. त्यातच साधू आणि स्थानिक नागरिकांनीही नाराजीचा सूर लावला.
Sinhastha Kumbh Mela
Sinhastha Kumbh MelaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kumbh Mela News : सिंहस्थ कुंभमेळा आणि शाहीस्नान हे धार्मिक परंपरा व संकेत यानुसारच पार पडते. यामध्ये बदल करण्यास शक्यतो साधू आणि आखाड्यांची तयारी नसते. यंदा मात्र या संदर्भात एक मोठा बदल होऊ घातला आहे.

कुंभमेळा पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाच्या तयारीची बैठक रविवारी त्र्यंबकेश्वर येथे झाली. यावेळी शहरातील सद्यस्थिती व विकास कामांमुळे झालेल्या अडचणी याचा आढावा घेण्यात आला. यावेळी शाहीस्नानाच्या मिरवणुकीसाठी पर्याय मार्गाला मान्यता देण्यात तयारी दर्शविण्यात आली.

त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे महंत शंकरानंद सरस्वती आणि महंत दुर्गादास यांनी स्थानिक नागरिकांची सोय विचारात घेतली जाईल. स्थानिकांना त्रास होत असल्यास कुंभमेळा शाही स्नानाचा पर्यायी मार्ग स्वीकारण्याची तयारी त्यांनी दाखवली.

यानिमित्ताने शतकाहून अधिक काळापासून निश्चित असलेला शाही स्नानाचा मार्गात बदल करण्याचे संकेत मिळाले. 2003 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा शाहीस्नान मिरवणुकीच्या मार्गातही बदल झाला होता. आता असाच बदल त्र्यंबकेश्वरला होण्याची शक्यता आहे.

कुंभमेळा पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाच्या तयारीची बैठकीला कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, विविध आखाड्यांचे स्थानिक प्रतिनिधी, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष शिरसाठ, तहसीलदार जाधव यांसह विविध वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Sinhastha Kumbh Mela
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळा की प्रशासकीय अनागोंदी, राष्ट्रपतींच्या उपस्थितीचा गाजावाजा, निमंत्रणाचाच विसर?

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवर नाराजी

नागरिकांनी व लोकप्रतिनिधी सात महिन्यांपूर्वी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. त्यात स्थानिक नागरिकांची दुकाने व निवासाची बांधकाम पाडण्यात आले. त्यात स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्याबाबत पुनर्वसनाचा निर्णय झालेला नाही. स्थानिकांना डावलून कुंभमेळा कसा होणार? या शब्दात आक्रमक होत तक्रारी या बैठकीत करण्यात आल्या.

Sinhastha Kumbh Mela
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ बंदोबस्तासाठी नाशिकमध्ये 40 हजार पोलिसांची फौज ; निवासासाठी मंगल कार्यालये, लॉन्स, लॉजेस 60 दिवस ताब्यात घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com