Nashik Municipal Corporation  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Municipal Corporation : काँग्रेसच्या गोंधळात भाजपची सातव्या जागेसाठी फिल्डिंग ; स्वीकृत नगरसेवक निवडीत ट्विस्ट?

Nashik Municipal Corporation Swikrut Nagarsevak : काँग्रेसच्या गोंधळात भाजपचा सातव्या जागेवर डोळा असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.

Ganesh Sonawane

Nashik Municipal Corporation Swikrut Nagarsevak : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची प्रक्रिया राष्ट्रपतींच्या दौऱ्याचे कारण देत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यासाठी वेळ मिळाला असला तरी काँग्रेसकडून उमेदवाराच्या नावावर एकमत होत नसल्याने पक्षांतर्गत गोंधळ वाढल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसमधील याच गोंधळाचा फायदा आता भाजप घेण्याच्या तयारीत आहे.

महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या १० जागांमध्ये भाजपच्या वाट्याला सर्वांधिक ६ जागा येणार आहे. मात्र, कॉंग्रेसमधील गोंधळाचा फायदा घेत सातव्या जागेवर भाजपचा डोळा असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. कॉंग्रेसच्या वाट्याची एक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवड प्रक्रियेत ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता असून राजकीय रंगत वाढली आहे.

उमेदवार निश्चित करण्यावरुन कॉंग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे. काँग्रेसच्या पारंपरिक भूमिकेला छेद देत स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्थानिक स्तरावरून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने पक्षात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

याच नाराजीतून काँग्रेसचे तीनही नगरसेवक शहर विकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. महापालिकेत शिवसेना ठाकरे गट व कॉंग्रेसने एकत्रित गट नोंदणी केली आहे. त्यामुळे दोघांच्या शहर विकास आघाडीला दोन जागा मिळणार आहेत. मात्र, कॉंग्रेसचे तीन नगरसेवक या गटातून बाहेर पडल्यास गटनोंदणी आणि संख्याबळाच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप संधी हेरण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचे पाठबळ मिळविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गटनोंदणी रद्द होण्यासारख्या तांत्रिक बाबींचा परिणाम निवड प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि आघाडीतील समीकरणे भाजपच्या पथ्यावर पडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सध्या संभाव्य हालचालींबाबत संबंधित पक्षांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परंतु काँग्रेसमधील उमेदवार निश्चितीचा तिढा शेवटपर्यंत न सुटल्यास समीकरणे बदलू शकतात असे बोलले जात आहे. भाजपला कॉंग्रेस नगरसेवकांचे अतिरिक्त पाठबळ मिळते की, कॉंग्रेसमधील तिढा सुटतो यावर पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT