Nashik Politics : गेल्यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या भाजपने यंदा नाशिकमध्ये शंभर प्लसचा नारा दिला होता. संकटमोचक गिरीश महाजन यांनीच हा नारा दिला होता. मात्र भाजपचा हा नारा थोडक्यात हुकला. महाजन यांनी उघडपणे शंभर प्लसचा नारा दिला होता व मुख्यमंत्री फडणवीस यांना ८० प्लस जागांचे आश्वासन दिले होते. पण भाजपची गाडी ७२ जागांवर थांबल्याने भाजपचे शंभर प्लसचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांना मी ८० प्लस जागांचे आश्वासन दिले होते. मात्र एबी फॉर्म वाटपाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे आठ ते दहा जागांचा फटका बसला. त्यामुळे ७२ जागांवर समाधान मानावे लागले. नाशिकमधील भाजपच्या विजयाने समाधानी आहे पण पूर्ण समाधानी नाही असे वक्तव्य भाजपचे मंत्री व ज्यांच्या खांद्यावर नाशिकची जबाबदारी होती त्या गिरीश महाजन यांनी केले. भाजप कार्यालयात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत महाजन बोलत होते.
नाशिकमध्ये भाजपला आता मित्रपक्षांची मदत न घेता एकहाती सत्ता राबविता येणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपला हेच हवे होते. त्याच साठी महाजन यांनी हट्टाहास केला होता असे म्हणायला हरकत नाही. त्यासाठीच भाजपमध्ये इतके मोठे ऑपरेशन लोटस महाजन यांनी राबवले. त्यात महाजन यांना यशही आले आहे.
परंतु नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत १२२ जागांपैकी शंभर प्लस अर्थात शंभर हुन अधिक जागा मिळवण्याचे भाजपचे स्वप्न होते. मात्र हा जादूही आकडा भाजपला गाठता आलेला नाही. भाजपला गेल्यावेळी ६६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी शंभर प्लसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाजन यांनी विरोधी पक्षातील अनेक मात्तबरांना आपल्या पक्षात घेतले. आजवर जिथे कधीही कमळ फुलले नाही असे प्रभाग महाजन यांनी टार्गेट केले. त्या प्रभागातील मात्तबर पक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबात उमेदवारीही दिली. महाजन यांचे हे बेरजेचे राजकारण बरोबर निघाले. भाजपने गेल्यावेळी पेक्षा अधिक जागा त्याही स्वबळावर जिंकल्या.
महाजन यांचे म्हणणे झाले की, एबी फॉर्मचे वाटप करताना चार ते पाच ठिकाणी गोंधळ झाला. त्यामुळे १० ते १५ जागा आमच्या हातच्या गेल्या. त्यामुळे काही जणांनी नाराजी व्यक्त केली. मुकेश शहाणे यांचेही तिकीट होते. ते आमच्याकडून लढले असते तरी निवडून आले असते. कारण त्यांनी कामे भरपूर केली होती. कोणाला तिकीट द्यायचे याची यादी फायनल झाली होती. काहींनी आपली नावे टाकून घेतली. तिकीटची पळवापळवी झाली नसती तर जागा वाढल्या असत्या. एबी फॉर्म घ्यायला नागरिक सारखे मागे पळायचे अशी खंत महाजन यांनी बोलून दाखवली.
पक्षीय बलाबल असे
एकुण जागा १२२
भाजप-७२
शिवसेना-२६
राष्ट्रवादी कॉंग्रेस-४
शिवसेना उबाठा-१५
कॉंग्रेस ३
मनसे १
अपक्ष १
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.