BJP North Maharashtra meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : नाशिक महापालिका स्वबळावरच लढू, भाजप पदाधिकाऱ्यांंनी फडणवीसांना सांगितले गणित..

Nashik Municipal Election : भाजपच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे महापालिका निवडणुक स्वबळावरच लढू असा हट्ट धरला व तशी मागणी केली.

Ganesh Sonawane

Nashik Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने राज्यभरात तयारी सुरु केली आहे. काल (शुक्रवार ता. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नाशिकमध्ये झाली.

बंद खोलीत झालेल्या चर्चेत नाशिक महापालिकेच्या (Nashik Mahapalika) निवडणुकीसंदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांसमोर स्वबळाचा हट्ट धरला. मागील निवडणुकीत(2017) भाजपला स्पष्ट बहुमताने सत्ता मिळाली होती. या वेळेला देखील बहुमताने सत्ता मिळविण्यासाठी तेवढे संख्याबळ आपल्याजवळ आहे. त्यामुळे स्वबळावर महापालिकेची निवडणूक लढविण्याची एकमुखी मागणी भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.

भाजपने नाशिक महापालिकेसाठी शंभर प्लसचा नारा दिला आहे. शंभरहुन अधिक नगरसेवक आपण स्वबळावर निवडून आणू शकतो असा विश्वास व्यक्त करत तसे गणित पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना सांगितले. पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पक्षात आता 70 माजी नगरसेवक आहेत. 2017 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर मते मिळालेली 42 उमेदवार आहेत. असे मिळून 112 उमेदवारांचे गणित मांडण्यात आले. त्यामुळे हे गणित पाहाता नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यात यावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान बंद खोलीत झालेल्या या चर्चेनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मात्र फडणवीसांनी स्वबळावर की महायुती याबाबत काय ते गुलदस्त्यातच ठेवले. त्यांनी जिथे युती करता येईल तिथे करु जिथे तुल्यबळ पक्ष असतील तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगत मैत्रीपूर्ण लढतीचे सूचक संकेतही दिले. तसेच युती केल्यास 'युतीचे शंभर' असे म्हणत एक प्रकारे संभ्रम निर्माण केला.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मात्र फडणवीसांकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये भाजपसाठी चांगले वातावरण आहे. शहरात तीन आमदार भाजपचे आहेत. त्यातले दोन आमदार तर सलग तीन टर्म निवडून आले आहेत. नाशिक पूर्व मध्येही ८८ हजारांच्या लीडने भाजपला यश मिळाले आहे. मागच्या निवडणुकीतही भाजपलाच सत्ता मिळाली होती. आता भाजपची ताकद तर अधिकच वाढली आहे असं पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT