Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी टायमिंग साधलं; प्रभू रामाचं दर्शन घेताच, भाजपला वेगळ्या युद्धाची आठवण करून दिली

Nashik NCP Chhagan Bhujbal BJP central government Donald Trump trade war policies : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजब यांनी नाशिक इथं काळाराम मंदिरात येत प्रभू श्रीरामाच दर्शन घेताच, डोनाल्ड ट्रम्पने सुरू केलेल्या व्यापारयुद्धाची भाजपला आठवण करून दिली.

Pradeep Pendhare

Bhujbal on BJP : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीचं दर्शन घेतलं.

यानंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धाची केंद्रातील भाजप सरकारला आठवण करून दिली. भारताला देखील जशास-तसं उत्तर द्यावं लागणार आहे. फायदा-तोटा बघूनच निर्णय घ्यावे लागतील, असेही भुजबळ यांनी म्हटले.

भाजपचे दीड कोटी सदस्य नोंदणी झाली आहे. भाजपचा (BJP) आज स्थापना दिन देखील साजरा होत आहे. भुजबळ यांनी भाजप पक्ष वाढीच्या शुभेच्छा दिल्या. पण देशसेवा घडावी, असे सांगताना, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळं युद्ध सुरू केल्याकडे लक्ष वेधले. हे व्यापार युद्ध असून, यातून आपल्याला पुढे जायचे आहे, याची आठवण छगन भुजबळांनी करून दिली. हे युद्ध लढण्यास आपल्याला शक्ती मिळो. भारत सुद्धा फायदा-तोटा बघून प्रयत्न करेल, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. माध्यमांनी देखील ते दाखवले. राज्यातील महायुती सरकारने देखील ते पाहिले असेल. शेतकऱ्यांबाबत राज्यातील महायुती सरकार सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा छगन भुजबळांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली होती. त्यावर बोलताना कुठं उत्तर देत बसता, पण फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करणे चुकीचे आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूरपणे मारले. हे क्रौर्य मनावर बसले आहे. महाराज मात्र शरण गेले नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरले जाते की नाही, याची तपासणी करण्याचा आदेश दिला होता. त्यावरून महाराष्ट्रात बराच गदारोळ झाला. आता राज ठाकरेंनी हे आंदोलन मागे घेतले आहे. आता राज ठाकरेंचा हा मुद्दा सरकारी दरबारी गेला. बँकेतील लोकांनी देखील मुद्दा मांडला. 25 भाषा आहे. सगळ्या भाषा शिकू शकतो का? त्यांचा हा मुद्दा देखील विचारात घेतला पाहिजे, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT