Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीवर संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, विचारल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. 'जाऊ दे यार', असं म्हणत प्रतिक्रिया देणं टाळलं. तर शरद पवार यांनी उत्तरच देणं टाळलं.
खासदार सुप्रिया सुळेंनी देखील आनंद व्यक्त केला, तर रोहित पवार यांनी पुढं जात सगळ्या कुटुंबियांनी एकत्र यावं, असं म्हणत, पवार कुटुंबाबाबत सूचक विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची यावर प्रतिक्रिया आली आहे.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे सांगत आपले चुलत बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळीसाठी हात पुढं केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील टाळी देण्यासाठी सशर्त तयारी दर्शवली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाच्या चर्चेनं महाराष्ट्र ढवळून निघालं आहे.
ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाच्या चर्चेवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं असलं, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधूंच्या मनोमीलनासह त्यांनी पवार कुटुंबाबाबत सूचक, असं विधान केलं.
ठाकरेंबरोबर पवार कुटुंब देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. राज्यात २०२२ नंतर पक्ष फुटाफुटीचे राजकारण झाले. उद्धव ठाकरे यांची शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार, खासदारांनी बंडखोरी केली. तत्पूर्वी राज ठाकरेंनी शिवसेना सोडून स्वतःचा मनसे पक्ष स्थापन केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार आमदारांसह बाहेर पडले.
पक्ष फुटाफुटीनंतर राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकदा मनोमीलनाचे वारे वाहू लागले. यावर सत्ताधारी आणि विरोधक सावध प्रतिक्रिया देत आहेत, तर शिवसेना आणि मनसेंमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रोहित पवार यांनी देखील टायमिंग साधत पवार कुटुंबाच्या मनोमीलनाबाबत सूचक विधान केले.
शिवसेनेचे पूर्वीचे नेते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य छगन भुजबळ यांनी बाळासाहेब असतानाच, मी शिवसेनेतून बाहेर पडलो. आजही शिवसेनेबद्दल आमचे प्रेम कमी झालेले नाही. सगळीच कुटुंब एकत्र आली, तर फार बरं होईल, असे म्हणत पवार कुटुंबाच्या मनोमीलनाचा सूचक भाष्य केलं. या विधानानंतर छगन भुजबळ पवार कुटुंबाच्या मनोमीलनाचा प्रयत्न करणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. ठाकरे बंधूंच्या युती परिणाम निश्चित होईल, असे सांगताना, निश्चितपणे परिणाम होईल, शिवसेनेची शक्ती वाढेल, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.