
Maharashtra Politics : विधानसभा निवडणूकीच्या वेळेला नांदगाव मतदारसंघात महायुतीची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना देण्यात आली होती. मात्र, समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा व मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
मात्र, आता आपण राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला असला तरी तो अजित पवार यांनी आजून स्विकारलेला नाही. त्यामुळे आपण राष्ट्रवादीच असल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतरही पक्षातील अनेक कार्यक्रमात मी सहभागी राहिलो आहे. त्यावर मुंबईचे अध्यक्ष पद किंवा दुसरी काही जबाबदारी दिली जाईल का असे विचारले असता ते पक्ष ठरवेल असं समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे समीर भुजबळांचा राजीनामा हा केवळ राजकीय खेळी होती का असा सवाल उपस्थित होत असतानाच सुहास कांदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुहास कांदे म्हणाले, समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्ष पदाचा व राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आदरणीय अजित पवार यांच्याकडे दिला होता. माझ्या माहितीनुसार तो अजित दादांनी स्विकारला सुद्धा होता. कारण, आमच्या महायुतीची पॉलिसी होती की जो महायुतीच्या विरोधात काम करेल किंवा युतीच्या विरोधात उमेदवारी करेल त्याची त्या पक्षातून हकालपट्टी केल्या जाईल असे माझ्यासमोर शिवसेना, बीजेपी व राष्ट्रवादीचे अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी समीर भुजबळ यांचे एक मोठे उदाहरण आहे.
समीर भुजबळ यांनी राजीनामाही दिला नसला तरी सुद्दा समीरची मुंबई अध्यक्षपदावरुन व राष्ट्रवादीच्या सदस्यपदावरुन हकालपट्टी केली असती. त्यांची अशीही हकालपट्टीच केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मला असं वाटतं की समीर भुजबळ हा हुसकलेला प्राणी आहे, त्यांना पक्षात घेतलेले नाही आणि घेणारही नाही. त्यावेळी मी एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर समीर भुजबळ यांची तक्रार केली होती. अजित पवार हेही समोर होते. अजित दादांनी समीर भुजबळ यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, समीर भुजबळ यांनी दिलेले राजीनामे स्विकारले आहेत अशी माहिती दिली होती असे सुहास कांदे म्हणाले.
आतापर्यंत तरी महायुतीत जे विरोधात होते त्यांना स्विकारण्याची पॉलिसी महायुतीत ठरलेली नाही. ईडी आणि सीबीआय पासून वाचण्यासाठी ते अजित पवार यांच्यापुढे पुढे करताय, भुजबळ साहेबांचे आता वय झाले पण, समीर भुजबळांवर मला दया येत आहे. हुसकलेलं असताना ते परत येत आहेत अशी जळजळीत टीका कांदेंनी केली.
राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येतील यावर काय वाटतं असा प्रश्न केला असता, कांदे म्हणाले.. तो त्या दोघा भावांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी एकत्र यायचं की नाही ते ठरवतील. माझ्या सारख्या सामन्य कार्यकर्त्याला त्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचं कांदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.