Devendra Fadanvis & Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar On Warkari: भक्तीत शक्तीची जोड! शरद पवारांशी वारकऱ्यांची सहमती; प्रतिगामी घुसखोरीविरूद्ध एल्गार

Nashik-NCP- Leader- Sharad- Pawar-Statement- Varkari-Amar-Thombre-Supports- Criticised-BJP-समता हे वारकरी संप्रदायाचे मूळ, मात्र घुसखोरी केलेले स्वयंघोषीत लोक धर्मांध शक्तींना बळ मिळेल अशी मांडणी करतात

Sampat Devgire

Amar Thombare News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साठ टक्के प्रतिगामी लोकांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी केल्याची टिका केली होती. त्याला वारकरी सांप्रदायातील विविध घटकांनी सहमती दर्शवली आहे. या स्वयंघोषीत लोकांचा मोठा धोका वारकरी सांप्रदायाला निर्माण झाल्याचा दावा वारकऱ्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नवी दिल्लीतील शासकीय अधिकाऱ्यांच्या मेळाव्यात वारकरी सांप्रदाय समतेचा चळवळीवर आधारीत आहे, असे म्हटले. त्यात प्रतिगामी शक्ती घुसखोरी करीत आहेत. साठ टक्के किर्तनकार हे धर्मांध शक्तींना बळ मिळेल अशा पध्दतीने मांडणी करतात, अशी टिका केली होती.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली होती. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या नेत्यांनीही त्याचा संबंध थेट धर्माशी जोडला होता. त्यामुळे नव्या राजकीय वादाला विषय मिळाला. त्यावर विवध स्तरावर प्रतिक्रीया उमटल्या आहेत.

या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त डॉ. अमर ठोंबरे पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यांचे वक्तव्य अतिशय मार्मिक आहे. आज वारकरी संप्रदाय या प्रतिगामी लोकांमुळेच धोक्यात आला आहे. वारकरी संप्रदाय मुळातच अवैदीक असून तो धर्मनिरपेक्ष आहे.

या बळावरच वारकरी चळवळ उभी आहे आणि होती. धर्मांध शक्तींनी गेल्या अनेक वर्षांपासून त्यात बाधा आणण्याचे काम केले. सुनियोजीत पद्धतीने प्रथितयश कीर्तनकार, समाज प्रबोधनकार यातील सन्माननीय अपवाद वगळले तर बहुसंख्य कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार समाजामध्ये धार्मिक द्वेष पसरवत आहेत. त्यात कीर्तनकारांची संख्या जास्त आहे. महिला कीर्तनकार सुद्धा हिंदू- मुस्लिम वाद लावत आहेत.

शेकडोंच्या संख्येने त्यांची नावे घेता येतील. ज्या कुंभमेळ्याचा आणि वारकरी संप्रदायाचा काडीमात्र संबंध नाही. त्या कुंभमेळ्याचा संबंध वारकरी संप्रदायाशी  जोडत आहेत. कुंभमेळ्यातील ढोंगी साधूंना संत तुकाराम महाराजांनी सोळाव्या शतकात कडाडून विरोध केला आहे.

खरात सारखे प्रकरण एकीकडे ताजे असताना भाजप प्रणित धार्मिक आघाड्या त्यावर चुप्पी साधून आहे. संगमनेर येथे आम्हाला नथुराम व्हावं लागेल, असे वादग्रस्त विधान करणारा स्वयंघोषित समाज प्रबोधनकार संग्राम भंडारे हे त्याचे ठळक उदाहरण आहे. त्याने अनेकदा हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहे.

अर्थात या तथाकथित कीर्तनकारांकडून वारकरी संप्रदाय मधील धर्मनिरपेक्षता धोक्यात येत आहे आणि ती दिवसेंदिवस येत आहे. सुमारे 80% कीर्तनकार हे केवळ धर्मांध शक्तींना पूरक ठरेल अशी संतांच्या अभंगाची मांडणी करत आहेत. वारकरी शिक्षण संस्थांमधून लहान मुलांना धर्मांधतेचे धडे देणे त्यांना फक्त ब्राह्मणी धर्म शिकवणे अधिक वेदोक्त बनवणे या शिकवणी वारकरी शिक्षण संस्थांमधून मिळत आहेत त्यातील काही सन्माननीय एखादी दोन संस्था वगळल्यास बाकी

अनेक संस्था हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेतील कोवळ्या मुलांचा वापर करत आहे. ही स्थिती अत्यंत विदारक आहे.  त्याला प्रथितयश कीर्तनकारांचा पाठिंबा मिळत आहे, पुरोगामी महाराष्ट्राला हे अतिशय निंदनीय आहे. वारकरी समता केंद्रस्थानी घेऊन उभा आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT