Rohit Pawar: अजित पवार म्हणजे KGF मधील रॉकीभाई! रोहित पवारांनी उधळली स्तुतीसुमनं

Rohit Pawar: पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. दोन्ही महापालिकांमध्ये त्यांच्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे.
Rohit Pawar, Ajit Pawar
Rohit Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar: पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. दोन्ही महापालिकांमध्ये त्यांच्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रचार सभेत बोलताना रोहित पवारांनी अजित पवारांचा उल्लेख KGF सिनेमातील रॉकीभाई असा केला. रॉकीभाई ज्या प्रकारे सर्वसामान्यांसाठी काम करतो तशीच काम अजित पवारांकडून होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar, Ajit Pawar
Devendra Fadnavis: बिनविरोध निवडणुकांवर फडणवीसांचा अजब तर्क! म्हणाले, किरीट सोमय्यांच्या मुलाविरोधात...

रोहित पवार म्हणाले, भाजपला वाटतं महानगरपालिकेत आमची अशीच सत्ता राहील. मग तिथं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली, सर्व पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की इथली सामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळं भाजपच्या दोन घमंडी गरुडांना घरी बसवायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल, या कार्यकर्त्यांची ही इच्छा आम्ही नेत्यांना सांगितलं. त्यानंतर आपण निर्णय घेतला की या महापालिकेच्या भवितव्यासाठी पूर्वी जे काही आमचे विषय झाले असतील ते सर्व विसरायचे आणि सामान्य लोकांसाठी एकत्र यायचं.

Rohit Pawar, Ajit Pawar
Nagpur Election: भाजपचा बंडखोरांना मोठा झटका! तब्बल 32 जण एकाचवेळी निलंबित

त्यामुळं केजीएफमध्ये जो हिरो होता त्याच्या हिरोचं नाव होतं रॉकी. या रॉकीची भूमिका काय असायची सामान्य लोकांच्या हितासाठी जी काही ताकद असेल ती एक करायची आणि गरुडाला घरी बसवाचं. त्यामुळं राजकीय दृष्टीकोनातून गरुडाला आपण घरी बसवायचं आणि ते देखील लोकशाहीच्या माध्यमातून. त्यामुळं या निवडणुकीत तुमच्यावतीनं भूमिका मांडताना आपली रॉकी कोण तर दादा हे फक्त आपण लक्षात ठेवायचं.

Rohit Pawar, Ajit Pawar
Maratha Reservation : ‘मराठा-कुणबी’ शोध समितीचे अध्यक्ष न्या. संदीप शिंदेंची दुसऱ्या मोठ्या पदावर नियुक्ती : समितीचे काय होणार?

२०१७ मध्ये पिंपरी-चिंचवडचा जाहीरनामा भाजपनं आणला होता त्यात २० ते २२ मुद्दे होते, त्यातील एकही मुद्दा यांनी पूर्ण केला नाही. तर भाजपच्या नेत्यांनी इथं फक्त आपली घरं भरली. त्यांच्या भागात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे त्यातही या लोकांनी पैसे खाल्ले. अशा विचाराचे लोक येतील, धमकी देतील पण घाबरायचं नाही आणि सत्ता आपल्या विचारांची आणायची असं आवाहन यावेळी रोहित पवारांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com