Sanjay Chavan on smart meter controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Chavan: दुप्पट बिल आणि सामान्य जनतेची लूट करणाऱ्या स्मार्ट मीटरचा आग्रह सोडा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा!

Sanjay Chavan strongly opposes installation of smart meters: स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होते दुप्पट बिलाची वसुली, तांत्रिक दोष आणि नागरिकांत संताप.

Sampat Devgire

Maharashtra smart meter protest news: विधिमंडळात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती नसल्याची भूमिका सरकारने मांडली होती. प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा विरोध डावलून स्मार्ट मीटर बसविले जात आहे. या मीटरच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी याबाबत सरकारला थेट इशारा दिला आहे. 48 तासाची नोटीस देऊन विज वितरण मंडळ परस्पर स्मार्ट मीटर बसवत आहे. नागरिकांचा त्याला प्रचंड विरोध असूनही दुर्लक्ष केले जाते. 

स्मार्ट मीटर बसविण्यास जनतेचा प्रखर विरोध आहे. हजारो नागरिकांनी या मीटर मधील त्रुटी आणि आर्थिक घोटाळे व प्रमाण मांडले आहेत. मंडळाकडे त्याविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या आहेत.

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर विजेचे बिल दुप्पट तिप्पट येऊ लागले आहे. विजेचा वापर न वाढता हे बिल कसे वाढते? या मीटरच्या माध्यमातून भविष्यात प्रीपेड वसुली करण्याचा सरकारचा डाव आहे. की जनतेची लूट करण्याची नवी पद्धत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार चव्हाण यांनी केला.

स्मार्ट मीटर विषयी तज्ञांनी अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहे. या मीटरमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. मीटर बसविल्यावर विजेचे बिल आपोआप कसे वाढते? सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात कोणतीही वाढ न होता विजेच्या माध्यमातून त्यांची लूट करण्याचा हा प्रशासनाचा डाव आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. 

याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ग्राहकांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत शासनाने मीटर बसविण्याची सक्ती केली जाणार नाही असे न्यायालयापुढे मांडले आहे. अध्यक्ष कृती करताना वीज ग्राहकांच्या भावना दुर्लक्षित केल्या जात आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी आमदार चव्हाण यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT