Police Bharti Result Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : फक्त दोन मार्कांनी पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, तरुणीने घेतला टोकाचा निर्णय..

Police Bharti Result Nashik : पोलिस भरतीमध्ये अपयश आल्याने तणावात असलेल्या तरुणीने आपल्या आयुष्याचा शेवट केला. आपल्या घरातच गळफास घेत तीने जीवन संपवलं..या घटनेनं कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला.

Ganesh Sonawane

Nashik News : अहोरात्र कष्ट करुनही पोलीस भरतीत केवळ दोन गुणांनी अपयश आल्याने एका तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात उभाडे येथे घडली आहे. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (वय 20) असे या तरुणीचे नाव असून, तिच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ही पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न डोळ्यांत ठेवून अनेक दिवसांपासून कठोर परिश्रम करत होती. शनिवारी (दि. 11) सकाळी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास तिने आपल्या घरीच लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना समोर आली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घोटी पोलिसांना कळवले. दरम्यान, या प्रकरणाची प्राथमिक माहिती योगेश्वर विष्णू सुरुडे यांनी पोलिसांना दिली.

नाशिकमध्ये अलीकडेच जाहीर झालेल्या पोलीस भरतीच्या निकालाने प्रतीक्षेला मोठा धक्का बसला. या भरतीचा मेरिट कटऑफ 127 गुणांवर थांबला, तर प्रतीक्षाला 125 गुण मिळाले होते. केवळ दोन गुणांनी तिचे पोलीस दलात दाखल होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. या अपयशानंतर ती प्रचंड मानसिक तणावाखाली गेल्याचे सांगितले जाते. या दोन गुणांच्या फरकाचा धक्का ती सहन करू शकली नाही आणि त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रतीक्षा ही अत्यंत मेहनती आणि जिद्दी स्वभावाची असल्याचे सांगितले जाते. स्वतःच्या कष्टाच्या बळावर पोलीस दलात दाखल होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उंचावण्याचे तिचे स्वप्न होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

अशा घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की स्पर्धा परीक्षा किंवा भरती प्रक्रियेत अपयश आले तरी ते आयुष्याचा शेवट नसतो. राज्यभरातील तरुणांनी अपयशाला शिकण्याची संधी म्हणून स्वीकारत मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे. यश मिळवण्यासाठी सातत्य, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तसेच, कठीण प्रसंगी कुटुंबीय, मित्र किंवा मार्गदर्शकांशी संवाद साधणेही तितकेच आवश्यक आहे. प्रत्येक अपयशानंतर नवी संधी उभी असते, याची जाणीव ठेवून पुढे जाणे हाच खरा मार्ग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT