Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर संस्थानमध्ये दर्शनाचा काळाबाजार उघड, शरद पवारांच्या पक्षातील बड्या नेत्याला अटक

Trimbakeshwar Temple Scam : त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Purushottam Kadlag arrest
Purushottam Kadlag arrestSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्‍वरमधे भाविकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने कडलग यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मंदिर प्रशासनातील एका जबाबदार पदावरील व्यक्तीलाच अटक झाल्याने या कारवाईमुळे राजकीय वर्तुळासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अनंता सुरेश मेहंदळे (वय ४६) हे नाशिकहून त्यांच्या मित्रासह शनिवारी (दि. ११) एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यांनी २०० रुपयांचे देणगी दर्शन पास घेतले होते आणि रांगेत उभे असताना संशयित आरोपी गोटीराम मनाजी पेहरे (वय ४१, रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) हा त्यांना भेटला. रांगेत दर्शन घेतले तर अधिक वेळ लागेल ‘दहा मिनिटांत व्हीआयपी दर्शन करून देतो’ असे आमिष दाखवत त्याने तीन हजार रुपयांची मागणी या भाविकांकडे केली.

दुसरा संशयित आरोपी अभिषेक कडलग (रा. त्र्यंबकेश्वर) याच्या मदतीने मंदिरात प्रवेश देऊन त्यांना दर्शन घडविण्यात आले. दर्शनानंतर मंदिराबाहेर आल्यावर आरोपीने फिर्यादीकडून तीन हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र, मंदिर ट्रस्टकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत व्हीआयपी सेवा नसतानाही कोणतीही पावती न देता ही रक्कम घेतल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.

याप्रकरणी अनंता मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी सर्वात आधी गोटीराम मनाजी पेहरे आणि पुरुषोत्तम कडलग यांचा पुतण्या अभिषेक कडलग या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून गोटीरामला तत्काळ अटक करण्यात आली, तर अभिषेक कडलग सध्या फरार आहे.

पोलिसच भाविक बनून गेले

दरम्यान भाविकांकडून येणाऱ्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन राबवलं. यामध्ये पोलिसच भाविक बनून गेले होते. एका दिवसात तीन वेगवेगळ्या भाविकांकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांची लूट होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. या कारवाईत एका एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्याची चौकशी केली.

तपासादरम्यान या संपूर्ण तिकीटाच्या काळाबाजार रॅकेटमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलगचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. त्यानंतर सोमवारी रात्री पुरुषोत्तम कडलगला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अशा प्रकारे मंदिर ट्रस्ट विश्वस्तालाच अटक झाल्याने, या भ्रष्टाचाराचे मूळ थेट संस्थानच्या आतपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले असून खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com