Nashik Niphad Politics : पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेच्या निवणुकीच्या तोंडावर निफाड तालुक्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीची जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्याचा परिणाम म्हणून नगरपरिषद निवडणुकीत आमदार दिलीप बनकर व माजी सरपंच भास्करराव बनकर हे दोघे एकत्र आले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जेष्ठ नेते भास्कर बनकर यांनी बुधवारी शिवबंधन तोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घातले. तेही आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही बनकरांमध्ये झालेल्या समझोत्यामुळे निवडणुकीची आख्खी समीकरणे बदलली आहे.
मात्र उद्धव सेनेची चिंता यामुळे वाढली आहे माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. कदम यांच्या दोन निवडणुकांमध्ये भास्करराव बनकर यांचे भरीव योगदान त्यांना लाभले होते. मात्र आता बनकरांनी कदमांची साथ सोडली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेतृत्व करायला बनकर एकटे पडले आहे.
भास्करराव बनकर हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना तसे निमंत्रण आले होते. परंतु इकडे निवडणुक प्रक्रिया सुरु होऊनही भाजप प्रवेशाची गाडी पुढे सरकत नव्हती. तसेच भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही विरोध केल्याची चर्चा आहे. भाजपचा हा घोळ मिटत नसल्याने बनकर यांनी बुधवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
तसेच आमदार बनकर व भास्कर बनर यांना एकत्र आणण्यासाठी शहरातील काही नेते पडद्याआडून हाचचाली करत होते. त्याचवेळी भाजप व राष्ट्रवादीत नगराध्यक्षासह काही नगरसेवकांच्या जागांवरील तिढा काही सुटत नव्हता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महायुतीत मिठाला खडा पडला. त्यादरम्यान दोन्ही बनकारांमध्ये समाधानकारक वाटाघाटी झाल्याने दोघेही एकत्र आले.
दरम्यान आता निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांचा पक्ष अशीच लढत होण्याची शक्यता उरली आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे. तर निवडणुकीनंतर उपनराध्यक्षपदावर शिवसेना(शिंदे) गट दावा करण्याचीही शक्यता आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे नीलेश पाटील, राजेश पाटील, किरण लभडे, सत्यजित मोरे आदी या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.