Nashik NMC Election : वसंत गितेंचे पुत्र प्रथमेश यांना यंदा भाजपचे आव्हान, मोठा कस लागणार

Vasant Gite Son Prathamesh Gite: २०१७ च्या निवडणुकीत वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते भाजपकडून निवडून आले होते. मात्र आता ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असल्याने त्यांना भाजपकडूनच आव्हान राहणार आहे.
BJP candidate challenge in Nashik
BJP candidate challenge in NashikSarkarnama
Published on
Updated on

BJP vs Vasant Gite Son: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभागवार आरक्षण सोडत काल जाहीर झाली. प्रभाग क्रं. १५ हा तीन सदस्यीय प्रभाग आहे. या प्रभागात गेल्यावेळीसारखीच परिस्थिती असून माजी उपमहापौर प्रथमेश गिते, सुमन भालेराव, अर्चना थोरात या तिघांनाही संधी आहे. या प्रभागात मागच्या टर्ममध्ये दोन जांगावर महिला आरक्षण होते मात्र ते आरक्षण आता प्रभाग क्रंमाक १९ मध्ये पडले आहे.

प्रभाग १५ मध्ये काठेगल्ली, भाभानगर परिसराचा समावेश होतो. यंदा या प्रभागात घोषित झालेल्या आरक्षणामुळे गणिते बदलण्याची शक्यता आहे. या प्रभागात यापूर्वी सर्वसाधरण महिला राखीव, ओबीसी महिला राखीव व एक जागा ही खुल्या संवर्गासाठी राखीव होती. यंदा नव्या आरक्षण सोडतीत बदल झाला असून एक जागा ओबीसी राखीव झाली आहे. त्यामुळे या प्रभागात पुरुष व महिला असे दोघांनाही निवडणूक लढवता येणार आहे.

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते, अर्चना थोरात, सुमन भालेराव भाजपकडून निवडून आले होते. पंरतु यंदा पक्ष बदलाचा परिणाम दिसून येणार आहे. सर्वसाधारण गटातून भाजप पक्षातर्फे निवडून आलेले माजी उपमहापौर प्रथमेश गीते यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उमेदवारी करणार आहे. शिवसेना (उबाठाचे) ते महानगरप्रमुख आहे. त्यामुळे या प्रभागात त्यांचा कस लागणार असून भाजपकडून त्यांना आव्हान असणार आहे.

BJP candidate challenge in Nashik
Nashik NMC Election : गिरीश महाजनांच्या कृपेने भाजपात कमबॅक, त्याच गणेश गितेंचा डावही यशस्वी : आरक्षणानंतर पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा

पंरतु माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांचे या प्रभागात चांगले काम असल्याचे सांगण्यात येते. त्यांचे काम आणि प्रभुत्व प्रभागात असल्याने त्यांच्या उमेदवारीने भाजप पक्षाचा एक उमेदवार कमी होणार असल्याचे जरी बोलले जात असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक सचिन मराठे यांच्यामुळे ती पोकळी भरून निघणार आहे.

BJP candidate challenge in Nashik
Nashik Politics : महायुतीने तुटेपर्यंत ताणल्यास दोन्ही बनकर एकत्र येणार? भाजपच्या युवा नेत्यांनी घेतला धसका

सर्वसाधारण गटांमध्ये भाजप पक्षातर्फे अनेक दिग्गज उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवारी उमेदवारी कोणास द्यायची यावरून भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याचा अप्रत्यक्षरीत्या महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com