Machhindra Sanap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NMC Standing Committee: भाजपची रणनीती यशस्वी; मच्छिंद्र सानप स्थायी समितीचे बिनविरोध सभापती!

Machhindra Sanap elected unopposed Standing Committee Chairman: स्थायी समिती सभापती निवडणुकीत सहकारी अन् विरोधकांना भाजपने हालचाल करण्याची संधीच दिली नाही.

Sampat Devgire

Machhindra Sanap News: महापालिका स्थायी समिती निवडणुकीसाठी भाजपने आखलेली रणनीती यशस्वी झाली. विरोधकांना संख्याबळ नसल्याने उमेदवार देता आला नाही. भाजपने तशी संधीच विरोधकांना मिळू दिली नाही.

भाजपचे मच्छिंद्र सानप महापालिका स्थायी समिती सभापती झाले. त्यांची आज बिनविरोध निवड झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सदस्य मुकेश शहाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूक आज झाली. या निवडणुकीसाठी भाजपने अतिशय नियोजनबद्ध कार्यवाही केली. बंद दाराआड पार पडलेल्या या प्रक्रियेत मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी प्रशासनाने अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. निवडणूक प्रक्रिये दरम्यान पत्रकारांनाही प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र  सुरक्षेच्या कारणास्तव निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतरच पत्रकारांना प्रवेश देण्यात आला.

सोळा सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे नऊ, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक सदस्य होता. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन सदस्य विरोधात होते. त्यामुळे संख्याबळ सत्ताधारी भाजपच्या बाजूने होते.

राष्ट्रवादी काँग्रेस गटात नोंदणी केलेल्या अपक्ष मुकेश शहाणे यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांशी संपर्क करून वेगळा डाव टाकण्याचा प्रयत्न केला. तर त्याचा काही उपयोग झाला. भाजपने आपले सदस्य सहलीला पाठवल्याने ते निर्धास्त होते.

श्री शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना कोणताही संकेत अथवा पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे आज कामकाज सुरू होताच शहाणे यांनी आपल्या अर्ज मागे घेतला. मंत्री छगन भुजबळ व अन्य वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेने आपण माघार घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता भाजपच्या हाती आहेत. महापौर, उपमहापौर यांसह सर्व महत्त्वाच्या पदांवर आता महायुतीचे वर्चस्व आहे. भाजप महापालिकेचा कारभार आपल्या कलाने हाकण्यास सिद्ध झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT