Satyajit Tambe Politics: राज्य सरकारचा अजब उपाय, नाशिकची समस्या आजची, उपाय सांगितला दशकानंतरचा!

Satyajit Tambe statement on state government decision: आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिककरांच्या समृद्धी महामार्ग कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नाला विधानपरिषदेत वाचा फोडली, नाशिककरांना दुहेरी टोल का?
Satyajit Tambe reaction on Nashik issue
Satyajit Tambe reaction on Nashik issueSarkarnama
Published on
Updated on

Nashik development issue: समृद्धी महामार्गाला नाशिककरांसाठी कनेक्टिव्हिटी नाही. त्यासाठी दुहेरी टोल देऊन लांबचा प्रवास करावा लागतो. या समस्येला विधान परिषदेत मंगळवारी वाचा फोडण्यात आली.

आमदार सत्यजित तांबे यांनी समृद्धी महामार्गाच्या विविध अडचणी उपस्थित केल्या. विधान परिषदेत झालेल्या चर्चेत पहिल्यांदाच नाशिकच्या नागरिकांच्या अडचणी आणि समृद्धी महामार्गाच्या तांत्रिक त्रुटी उघड करण्यात आल्या.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी समृद्धी महामार्गाशी संबंधीत नाशिक शहराच्या कनेक्टिव्हिटीबाबतच्या या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर दिले. मात्र त्यांनी सांगितलेल्या उपाययोजना प्रदिर्घ काळ चालणाऱ्या कामांबाबत होत्या. त्यामुळे आमदार तांबेसह अन्य सदस्यांचे त्यावर समाधान झाले नाही.

Satyajit Tambe reaction on Nashik issue
Jayakwadi Dam Land Acquisition Case : सहा कोटी जमा करा! अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; शेतकऱ्यांचा मोबदला थकवल्याने न्यायालयाचा दणका

नाशिकच्या नागरिकांसाठी समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी म्हणून ५०० कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाची कार्यवाही करण्यात आली नाही. हा निर्णय कोणी घेतला? त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आमदार तांबे यांनी विचारला. 

Satyajit Tambe reaction on Nashik issue
NMC BJP Politics: अजित दादांची राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळणार; भाजपसाठी ऑल सेट, स्थायी समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप निश्चित!

नाशिकच्या नागरिकांना समृद्धी महामार्गाला कनेक्ट होण्यासाठी ३०ते ४० किलोमीटरचा प्रवास करून इगतपुरीला जावे लागते. त्यासाठी दुहेरी टोल द्यावा लागतो. या रस्त्यात अनेक गैरसोयी आणि खड्डे आहेत. या अडचणींना नाशिककरांना तोंड द्यावे लागत आहे. 

समृद्धी महामार्ग हा राज्यातील एक प्रमुख मार्ग मानला जातो. मात्र या महामार्गाची रचना करताना त्यात काही त्रुटी राहून गेले आहेत. यामध्ये नाशिक मधून जाणारा हा महामार्ग असला तरी नाशिकच्या नागरिकांना मात्र कनेक्टिव्हिटी नाही. 

नंदुरबार धुळे मालेगाव सटाणा आणि कळवण येथील नागरिकांनाही समृद्धी महामार्गाची कनेक्ट होण्यासाठी लांबचा वळसा घालावा लागतो. या शहरांवर कनेक्टिव्हिटीबाबत अन्याय झाला आहे. कोपरगाव द्वारे कनेक्टिव्हिटी विस्तारीत करणे शक्य आहे. मात्र या पर्यायाचा अद्याप विचार का झाला नाही असा प्रश्न आमदार तांबे यांनी केला.

या चर्चेत शासनाकडून उत्तर देताना विविध पर्याय उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. भरवीर खुर्द येथून समृद्धी महामार्गाला नवी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे नाशिक शहराला जवळचा मार्ग उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. मात्र आमदार तांबे यांचे या उत्तरावर समाधान झाले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com