NMC Building, Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NMC Pathoholes: नाशिकमध्ये आहे एक रस्ता, त्यावर ३३ वर्षात एकही खड्डा झाला नाही, कोणी बांधला? कोणाच्या कारकिर्दीत झाला? हे माहित आहे काय?

Nashik NMC Khadde Politics Congress Mayor Shantaram Bapu Vavare and BJP Politics-शहरातील या भक्कम काँक्रीट रस्त्याच्या विरोधात त्याकाळी भाजप नेत्यांनी केला होता प्रचंड विरोध आणि आंदोलन

Sampat Devgire

Shantaram Bapu Wavre News: शहरात काल-परवा केलेल्या रस्त्यांनाही प्रचंड खड्डे झाले. या खड्ड्यांमुळे पाच नागरिकांचा बळी गेला. त्यावरून भाजपच्या कारभारावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. मात्र या सर्व गदारोळात नाशिक शहरातील एका रस्त्याला ३३ वर्षात एकही खड्डा झालेला नाही, हे माहिती आहे काय?  

नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने काँक्रीट रस्ते होत आहेत. यांसह एक दोन वर्षांपूर्वी केलेल्या खड्ड्यांचीही दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांवर प्रचंड खड्डे झाल्याने नाशिक शहराची अप्रतिष्ठा होत आहे. 

रस्त्यांतील खड्ड्यांवरून सत्ताधारी भाजप विरोधात विरोधकांनी रान उठवले. अगदी सत्तेत वाटेकरी असलेले देखील त्यात आहेत. मात्र रस्त्याच्या प्रश्नावरूनच शहराचे पहिले महापौर, काँग्रेसचे नेते (कै) शांताराम बापू वावरे आणि भाजप यांच्यात राजकारण आणि आरोप रंगले होते. भाजपने काँग्रेसला आरोप करून हैराण केले होते. 

विशेष म्हणजे महापौर (कै) यांच्या दूरदृष्टीचा नमुना म्हणून हा रस्ता आजही नागरिक अभिमानाने दाखवतात. शहराच्या मध्यवस्तीतील महात्मा गांधी रोड  १९९३ मध्ये काँक्रीटचा करण्यात आला. त्यासाठी महामार्गावरील अवजड वाहतुकीचे निकष लावण्यात आले होते. 

गेल्या ३३ वर्षात या रस्त्याला एकही खड्डा पडलेला नाही. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्याचे उत्तम रस्ता म्हणून महापालिका आणि नागरिक उल्लेख करतात. (कै) शिवनाथ कडभाने यांनी तो बांधला होता. त्यासाठी अवघे काही लाख खर्च झाले. 

मात्र राजकारणाचा भाग म्हणून तेव्हाच्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या रस्त्यात दोष आहेत असा आरोप केला. भाजपच्या माजी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या विरोधात आंदोलन झाले. हा रस्ता काँक्रीटचा करूच नये, अशी तेव्हा भाजपची भूमिका होती. त्यावरून महापौर वावरे यांच्यावर असंख्य आरोप भाजपने केले. 

सध्या शहरात भाजपची सत्ता आहे. त्यांनी केलेले रस्ते वादाचा विषय आहे. त्याबाबात विरोधक सातत्याने आरोप करीत आहेत. अलिकडच्या काळात बांधलेले रस्ते खड्डेमय झाले. काही पावसात वाहून गेले.

मात्र काँग्रेसच्या सत्ता काळात महापौर वावरे यांनी केलेला महात्मा गांधी रस्ता गेले ३३ वर्ष दिमाखात नाशिककरांना सेवा देत आहे. या रस्त्याला आजही एकही खड्डा नाही. त्यामुळे आजच्या राजकीय वादात महात्मा गांधी रस्ता दिमाखाने गुणवत्तेचे उदाहरण म्हणून पाहिला जातो. त्यासाठी प्रथम महापौर शांताराम बापू वावरे यांच्या दूरदृष्टीचा आवर्जून उल्लेख होतो.  

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT