Rajabhau Waje News: नाशिक शहरातील खड्डे आणि नादुरुस्त रस्त्यांचा प्रश्न महापालिकेची डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. समाज माध्यमांवर याबाबत नेटकरी आंदोलनाची तयारी करीत आहेत. आता राजकीय नेत्यांनीही महापालिकेला टार्गेट केले आहे. खासदार वाजे यांनी त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. नाशिक शहरातील निकृष्ट रस्ते आणि खड्डे यांची तातडीने चौकशी करावी. हे खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतले आहेत. त्यामुळे जबाबदार कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी.
नाशिक महापालिकेतील रस्त्यांच्या कामांबाबत सातत्याने तक्रारी आहेत. खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असून पाच नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे आता हा संतापाचा विषय बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात तातडीने लक्ष घालावे, असे खासदार वाजे म्हणाले
महापालिकेने केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. प्रत्येक रस्त्यावर धोकादायक आणि जीव घेणे खड्डे झाले आहेत. या संदर्भात महापालिका प्रशासन, अधिकारी आणि जबाबदार घटकांवर कारवाई व्हावी. मुख्यमंत्र्यांनी तज्ञामार्फत चौकशी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करावा, अशी मागणी वाजे यांनी केली.
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर महापालिकेतील विरोधी पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. शहराला कोणी वाली आहे का? असा सवाल भुजबळ यांनी केला.
सोशल मीडियावर रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ट्रेड झाला आहे. या संदर्भात उद्या (ता.१) ग्रामदैवत कालिका मंदिर येथे नेटकऱ्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षही खडबडून जागे झाले आहेत. सत्ताधारी महायुती आणि महापालिका प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.