NMC-BJP  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik BJP : महापालिकेपासून संसदेपर्यंत सत्ता, तरी नाशिकचे नागरिक नाराज? CM फडणवीसांनी सुरू केला 'रिअॅलिटी चेक'

Nashik NMC KumbhMela BJP leader Shivprakash meeting Corporator Absent - 'त्या' २७ नगरसेवकांची भाजपने घेतली गंभीर दखल, सगळ्यांची होणार झाडाझडती, काय आहे कारण?

Sampat Devgire

Devendra Fadanvis News : नाशिक महापालिकेपासून संसदेपर्यंत भाजप सत्तेत आहे. सिंहस्थ कुंभमेळा आणि अन्य माध्यमातून हजारो कोटींची कामे सुरू आहेत. तरीही शहरातील नागरिकांमध्ये नाराजीची चर्चा आहे. यामागी कारणांचा शोध भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली असून, नाशिकमधील पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे.

नाशिक महापालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत आहे. शिवाय त्यांनी सहकारी पक्षांना सोबत घेतले आहे. महापालिकेत अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. तरीही नागरिकांमध्ये अपेक्षित समाधान दिसत नसल्याचे निरीक्षण आहे. याची काय कारणे आहेत? नागरिकांमध्ये काय प्रभाव पडत आहे? हे जाणून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. 

शहरात सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधींमधील समन्वयाचा अभावही चर्चेचा विषय ठरला होता. महायुतीतील सहकारी पक्षांकडूनही भाजपबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याने पक्ष नेतृत्व सतर्क झाले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रतिनिधीमार्फत परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेही नाशिकमधील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी नुकतीच नाशिकला भेट देऊन नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र, 72 नगरसेवक असलेल्या भाजपच्या बैठकीला तब्बल 27 नगरसेवक गैरहजर राहिल्याने पक्षात खळबळ उडाली. गैरहजर नगरसेवकांनी प्रकृती किंवा वैयक्तिक कारणे दिली असली, तरी पक्ष नेतृत्वाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

'पार्टी विथ डिफरन्स' आणि शिस्तप्रिय पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपसाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी समन्वय साधूनही मोठ्या संख्येने नगरसेवक बैठकीला अनुपस्थित राहिल्याने वरिष्ठ नेते नाराज असल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, गैरहजर नगरसेवकांना तंबी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, आवश्यक वाटल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीसही बजावली जाऊ शकते. त्यामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आगामी काळात पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT