Nashik Politics : ठाकरेंचे 12 नगरसेवक शिदेंच्या गळाला लागलेच होते ; ऐनवेळी भाजपनेच फिरवला खेळ? नाशिकच्या राजकारणात इनसाइड गेम !

Nashik Shiv Sena, BJP Politics : नाशिकमध्ये भाजपनेच शिंदेंचा सुमडीत गेम केल्याची चर्चा आता रंगली आहे. शिदेंच्या तोंडाशी आलेल्या उद्धव ठाकरेंच्या १२ नगरसेवकांना भाजपनेच रोखल्याचे वृत्त आहे.
Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १२ नगरसेवकांना आपल्या गोटात आणण्याची शिंदे शिवसेनेची मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली होती. मात्र, या हालचालींची माहिती बाहेर आल्यानंतर संपूर्ण समीकरण बदलले आणि हा प्रयत्न अर्ध्यावरच फसला.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाशिक महापालिकेत १५ नगरसेवक आहेत. त्यातले १२ जण शिंदेंच्या गळाला लागल्याचे वृत्त होते. परंतु उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी पक्षाशी निष्ठा कायम असून एकही नगरसेवक फुटणार नाही असं स्पष्ट केलं. मात्र, त्यांना रोखण्यामागे एक अदृश्य हात होता आणि तो भाजपचा हात होता अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नाशिकमध्ये शिंदेसेनेची संघटनात्मक ताकद वाढू नये, किंवा वरचढ होऊ नये यासाठी भाजपमधील काही प्रभावी नेत्यांनी पडद्यामागून हस्तक्षेप केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, या दाव्याला उद्धवसेनेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Nashik APMC Politics : नाशिक बाजार समितीचे विभाजन रोखण्यासाठी चुंभळे गटाची धावाधाव; दबावातून विभाजनाचा आरोप, CM फडणवीसांकडे जाणार

सध्या नाशिक महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहाता भाजप हा बाहुबली आहे. १२२ पैकी एकट्या भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक आहेत. त्याखालोखाल शिंदे शिवसेनेचे २६ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना ही भाजपसोबत सत्तेतही सहभागी झाली आहे. शिवाय, शहरात शिंदेसेनेने आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या संपूर्ण घडामोडींमध्ये खासदार श्रीकांत शिंदे स्वतः लक्ष घालून संघटना विस्तारासाठी प्रयत्नशील आहेत. विरोधी बाकांवर बसल्यामुळे आपल्या प्रभागांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना उद्धवसेनेतील काही नगरसेवकांमध्ये होती. या नाराजीचा फायदा घेत शिंदेसेनेने त्यांच्याशी संपर्क वाढविला. प्रभागनिहाय सुमारे पाच कोटी रुपयांचा विशेष विकास निधी, विविध पदांची संधी आणि अतिरिक्त निधीच्या मदतीचे आश्वासन देत त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Ajit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी वादग्रस्त विधान; नाशिकच्या मविप्र संस्थेतील वाद पोहोचला पोलिसांत

शिंदेसेनेच्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात ठाकरेंचे पाच ते सहा नगरसेवक शिंदेसेनेत जाण्यास तयार होते. मात्र, फुटीसाठी दोन तृतीयांश नगरसेवक आवश्यक असल्याने आणखी नगरसेवकांशी संपर्क वाढविण्यात आला. त्यानुसार याप्रक्रियेत १० ते १२ नगरसेवक शिंदेसेनेच्या जाण्याच्या तयारीत होते, मात्र या हालचाली उघड झाल्यानंतर शिंदेसेनेचा गुप्त प्लॅन फसला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी एका एजंटकडून निधीचे आमिष दाखवून नगसेवकांना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. त्यानंतर नुकतेच ऑपरेशन टायगरमुळे हादरा बसलेले उद्धव ठाकरे यांना ही खबर लागताच ते सावध झाले. त्यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना मुंबईत थेट 'मातोश्री'वर बोलावून घेतलं. सर्वांशी चर्चा करुन बंड शांत केलं. तूर्तास सर्व शांत असले तरी शिंदेसेनेच्या या प्रयत्नांना ऐनवेळी खीळ घालण्यात भाजपमधील काही रणनीतीकारांची पडद्यामागून भूमिका होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नाशिकसह राज्यातही शिंदेसेनेचे राजकीय वजन भाजपच्या तुलनेत कमी असल्याचा मुद्दा पुढे करत संबंधित भाजप नेत्याने इच्छुक नगरसेवकांशी संवाद साधल्याची माहिती आहे. शिंदेसेनेत गेल्यास अपेक्षित राजकीय संधी मिळणार नाहीत, उलट भाजपमध्ये प्रवेश केल्यास अधिक प्रभावी पदे, विकासनिधी आणि पक्षात चांगले स्थान मिळू शकते, असे सांगून त्यांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.

शिंदेसेनेकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या उद्धवसेनेतील काही नगरसेवकांना ऐनवेळी भाजपच्या एका प्रभावी नेत्याने थांबविल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे, तर त्याच नगरसेवकांना भविष्यात भाजपमध्ये सामावून घेण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. या घडामोडींना पक्षाकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नसली, तरी संबंधित नेता सध्या भाजप संघटनेतील एका महत्वाच्या पदाच्या शर्यतीत असल्याचेही मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com