Devendra Fadnavis|Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: नाक दाबलं की तोंड उघडतं! शिंदेंच्या पॉवरपॉलिटिक्सने भाजपची झोप उडाली

Eknath Shinde BJP tension: मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सत्तेत शिवसेनेला हवा वाटा!

Sampat Devgire

Shinde Shiv Sena political strategy: नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता मिळणार आहे. मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीने भाजपची कोंडी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तेची सर्व पदे याच पक्षाकडे जातील. त्या दृष्टीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नियोजन करीत आहे.

नाशिक महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपकडे महापौरपदासह सर्व जागांसाठी जादुई आकडा आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेला विरोधी पक्षात बसावे लागेल.

विरोधी पक्षात बसल्यास शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेवकांची कोंडी होऊ शकते. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने माजी नगरसेवकांना अनेक आश्वासने दिली होती. या आश्वासनांमुळेच माजी नगरसेवकांनी त्या पक्षात प्रवेश केला आहे.

आता या प्रस्थापित आणि सत्तेसाठी शिवसेना शिंदे पक्षात आलेल्या नगरसेवकांची अस्वस्थता वाढू लागली आहे. भाजपने शिंदे सेनेला बरोबर न घेता स्वबळावर महापालिकेत कारभार करू शकते. असे झाल्यास शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेवकांची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

ही अस्वस्थता ओळखून स्थानिक नेत्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी वरिष्ठांकडे विनंती केली आहे. मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला शिवसेना शिंदे पक्षाची नितांत आवश्यकता आहे. शिवसेना शिंदे पक्षाशिवाय मुंबईत भाजपचा महापौर होण्याची शक्यता नाही. या परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठविण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

मुंबईत भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होता येईल. बरोबर नाशिक पुणे यांसह अन्यत्रही शिवसेना शिंदे पक्ष सत्तेत वाटा मागणार आहे. तशा हालचाली सुरू आहेत. नाशिक महापालिकेच्या काही पदांवर शिवसेना शिंदे पक्ष आग्रह धरू शकतो.

या राजकीय परिस्थितीत नाशिकच्या महापौर पदासाठी बुधवारी काय सोडत निघते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिकेत गट स्थापनेसाठी आज महत्त्वाचे निर्णय होतील. त्यावर आगामी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचे गणित ठरणार आहे. त्यात शिवसेना शिंदे पक्ष वाटा मागून भाजपचा घाटा करण्याच्या परिस्थितीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT