Ahmednagar News: कांदा प्रश्नावर राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जात असून ते कांदा निर्यातीबाबत अथवा नाफेडमार्फत कांदा खरेदीतून मार्ग काढून शेतकऱ्यांना निश्चित दिलासा देतील, असा विश्वास भाजप खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याबद्दल खासदार विखे यांनी खोचक टीका केली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे रस्त्यावर उतरणार आहे. यावर उत्तर देताना खासदार विखे यांनी खोचक टोला लगावला. त्यांना कुठेही उतरू द्या, त्यांच्या उतरण्याने अथवा त्यांच्या चढण्याने काही एक फरक पडणार नाही. महायुती सरकार शेतकऱ्यांशी प्रामाणिक आहे. सरकारने आतापर्यंत वेळोवेळी शेतकऱ्यांना मदतीचे निर्णय घेतले असल्याने आणि केंद्र सरकार पाठीशी असल्याने येत्या दोन दिवसांत यातून मार्ग निघेल, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगर शहरात डीपीडीसीच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने महानगरपालिकेने एमआयआर सेंटर सुरू केले आहे. अगदी अल्प दरात या ठिकाणी रुग्णांचा एमआरआय काढण्यात येणार आहे. या सेंटरचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते करण्यात आले.
शरद पवार (Sharad Pawar) यांचे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे, त्यामुळे ते स्वतंत्रपणे चालतात. त्यामुळे ते आंदोलन करत असतील, अशी खोचक टीका खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी शरद पवारांवर केली. त्यांना जे करायचं ते करू द्या, शरद पवार हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे, असे लोक म्हणतात. त्यामुळे ते स्वतंत्रपणे विद्यापीठ आहे, ते स्वतंत्रपणे चालतील, असं विखे म्हणाले.
एमआयआर सेंटर हे सर्व रुग्णासाठी आहे. कोणीही येथून तपासणी करून घेऊ शकतो. फक्त सर्वपक्षीय नगर सेवकांनी यात हस्तक्षेप करून मोफत तपासणीसाठी कुणाचीही शिफारस करू नये, इतक्या अल्प दरात कुठल्याही खासगी रुग्णालयात ही तपासणी होणार नाही. हे सांगतानाच काहींना आजकाल अनेक स्वप्ने पडत आहेत.
जनतेसाठी काही न करता कमी कालावधीत त्यांना खूप पुढे जायचे आहे. अशांनीही आपल्या डोक्याची एकदा तपासणी करून घेण्यास हरकत नाही, असा खोचक सल्ला विखेंनी दिला. हा सल्ला लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्यांसाठी असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी कुणाचेही नाव न घेता दिला.
(Edited by-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.