Sangamner News : विखेंचा 'ठराव', थोरातांचा 'पाठपुरावा' आणि तांबेंच्या 'निवेदना'वरुन राजकारण तापणार ?

Demand for funds for statue : संगमनेरमध्ये तिघांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी निधीची मागणी.
CM Eknath Shinde, MLA Satyajeet Tambe
CM Eknath Shinde, MLA Satyajeet TambeSarkarnama

Sangamner News : संगमनेर शहराच्या विविध विकासकामांसाठी आमदार सत्यजित तांबे सरसावले आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, फुले-शाहू-आंबेडकर यांचे स्मारक, संविधान प्रतिमेबरोबर १०० फुटी झेंडा उभारण्यासाठी निधीची मागणी केली.

दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे Radhakrishn Vikhe यांनी नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव पूर्वीच घेतला आहे. तर आमदार बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. एकाच कामासाठी तिघांकडून प्रयत्न सुरु असल्याने यावरुन राजकारण तापणार असल्याचे चित्र दिसते आहे.

CM Eknath Shinde, MLA Satyajeet Tambe
Rajasthan News : राजस्थानचा मुख्यमंत्री मराठी माणूस ठरवणार, दोन दिवसांत नावाची घोषणा

याबाबत नागपूर येथे सत्यजित तांबे Satyajit Tambe यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी काँग्रेस युवक शहराध्यक्ष निखील पापडेजा, शैलेश कलंत्री, मिलिंद औटी उपस्थित होते. संगमनेर Sangamner शहरातील मध्यवर्ती असलेल्या बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, यासाठी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

संगमनेर नगरपालिकेने एसटी महामंडळाला जागा देण्यासाठी प्रस्ताव दिला असून ही जागा तत्काळ मिळावी. तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांचा पूर्णकृती पुतळा उभारून, त्याठिकाणी सुशोभिकरणासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ विश्व युद्धात सहभागी झालेले व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त शहिद नामदेवराव जाधव यांच्या स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळावा, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हा नियोज समितीच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पूर्णाकृती बसवण्याचा ठराव घेतला आहे. यासंदर्भात प्रशासनला जागा निवडीच्या सूचना केल्या आहेत. या पुतळ्यांसाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपयांचा निधी सरकारकडून आणणार असे मंत्री विखे यांनी सांगितले होते.

तसेच असे एकाचवेळी प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वरूढ पुतळे बसवण्याचा उपक्रम राज्यातील पहिला आणि एकमेव कार्यक्रम होईल, असे मंत्री विखे यांनी म्हटले होते. प्रत्येक तालुक्यात पुतळ्याच्या जागेसाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही देखील सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातच आमदार सत्यजित तांबे यांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत संगमनेरसाठी निधीची मागणी केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पूर्णाकृती पुतळ्यासाठी स्वतंत्र निधी मागितली आहे. त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण पेटणार असे दिसते आहे.

Edited By : Amol Sutar

CM Eknath Shinde, MLA Satyajeet Tambe
Ajit Pawar : अमरावती आयुक्तांची अजितदादांनी घेतली फिरकी; म्हणाले, 'यापूर्वी तुम्ही...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com