Nashik Police Recruitment AI Image
उत्तर महाराष्ट्र

Nashik Police Recruitment : टोमण्यांवर मात करत खाकीकडे झेप, नाशिकमध्ये पोलिस भरतीच्या मैदानात तृतीयपंथीयाची दमदार कामगिरी

Transgender candidate police recruitment : नाशिक ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानात एका तृतीयपंथी उमेदवाराने आपल्या कामगिरीने साऱ्यांची मने जिंकली. सामाजिक बेड्या तोडून मुख्य प्रवाहात स्थान मिळवण्याची ही जिद्द ठरली.

Ganesh Sonawane

Police Recruitment : समाजात आजही तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा वेगळा अर्थात उपेक्षेचा आहे. मात्र या चौकटी मोडत नाशिकमध्ये एका तृतीयपंथी उमेदवाराने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पोलिस भरतीच्या मैदानात उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस दलात चालक पोलिस शिपाई पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत या उमेदवाराने मैदानी चाचणीत ५० पैकी तब्बल ३९ गुण मिळवले. स्वतःची लिंग ओळख ‘महिला/तृतीयपंथी’ अशी निश्चित करून नियमानुसार ८०० मीटर धावण्याची चाचणी देताना त्यांनी आत्मविश्वासाने मैदान गाजवले.

नाशिक ग्रामीण पोलिस भरतीच्या इतिहासात चालक पोलिस शिपाई पदासाठी तृतीयपंथी उमेदवाराने मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची ही उल्लेखनीय घटना ठरली आहे. शारीरिक मोजमापाच्या निकषात ६२ उमेदवार बाद झाले असताना, या उमेदवाराने सर्व तांत्रिक अटी पूर्ण केल्या. महिलांसाठी असलेल्या निकषांनुसार ८०० मीटर धावण्याचे आव्हानही त्यांनी समर्थपणे पार करत ३९ गुण मिळवले.

खाकीचे स्वप्न साकार करण्याची जिद्द आणि त्यादृष्टीने टाकलेलं पाऊल या कामगिरीने उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धक उमेदवारांचेही लक्ष वेधून घेतली तसेच मने सर्वांची जिंकली. समाजातील हजारो तृतीयपंथीयांसाठी ही एक प्रेरदायी गोष्ट आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस दलात चालक पोलिस शिपाईपदासाठी सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी एकूण ३ हजार नऊ उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यांपैकी एक हजार ८२० उमेदवार प्रत्यक्ष चाचणीसाठी हजर राहिले. महिलांसह तृतीयपंथी उमेदवारांनाही यंदा संधी देण्यात आली. शारीरिक मोजमापात ५८ उमेदवार अपात्र ठरले, तर एक हजार ५९५ उमेदवारांनी मैदानी चाचणीचा टप्पा गाठला.

या सर्व पोलिस भरती प्रक्रियेत लक्ष्य वेधून घेतले ते एका तृतीयपंथी उमेदवाराने. नियमित सराव, कठोर परिश्रम आणि समाजातील टोमण्यांकडे दुर्लक्ष करत त्यांनी ५० पैकी ३९ गुण मिळवले. त्यामुळे भरती प्रक्रियेत उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष या कामगिरीकडे वेधले गेले.

दरम्यान, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे. या भरती प्रक्रियेत तृतीयपंथी उमेदवाराला दिलेल्या या संधीमुळे समानता ही केवळ कागदावर नसून ती मैदानातही उतरली आहे असे म्हणालयला आता हरकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT