

जळगाव जिल्ह्यातील नेते व माजी खासदार उन्मेष पाटील यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश ठरला आहे. मुंबईत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार असून त्याआधीच एक ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. या क्लीपवर मंगेश चव्हाण यांचे राजकीय विरोधक भाजपचे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे.
एकीकडे, पाटील यांच्या निर्णयाने जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मशाल सोडून हाती धनुष्यबाण घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे व्हायरल क्लीपवरुन भाजप व शिवसेना शिंदे गटात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
उन्मेष पाटील हे आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतआपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश करत आहेत. मात्र, त्यापूर्वी उन्मेष पाटील यांची एक कथित क्लिप सध्या जोरदार व्हायरल झाली आहे. यात मंगेश चव्हाण यांच्या दाव्यानुसार उन्मेष पाटील यांनी मुस्लिम समाजातील एका कार्यकर्त्याला कॉल केला आहे. या क्लीपवर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. याबबात आमच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
उन्मेष पाटील हे पूर्वी भाजपमध्ये होते. भाजपमध्ये ते एकदा आमदार तर एकदा खासदार होऊन गेलेले आहेत. मात्र भाजपने त्यांना पुन्हा लोकसभेला 2024 ला उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी नाराजीतून भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून मंगेश चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. आता ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाआधीच एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. अपणा अजेंडा क्लियर है भाजप को दबाना है, अशा आशयाची उन्मेष पाटील यांची क्लीप आहे. एका मुस्लिम व्यक्तीशी ते बोलत असल्याचा दावा मंगेश चव्हाण यांनी केला आहे. यावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. एकनाथ शिंदेंनी कोणाला प्रवेश द्यावा हा त्यांचा विषय आहे. मात्र, आपणा अजेंडा क्लियर है भाजप को दबाना है हे नेमकं काय? असा सवाल मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. आम्ही यासंदर्भात आमच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत असं मंगेश चव्हाण यांनी सांगितलं आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
उन्मेष पाटील कार्यकर्त्याला म्हणाले, पठाणभाई मी उन्मेष बोलतोय. ६ मार्चला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपल्याला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे. सायगावमधून किती गाड्या हव्यात हे सांगा, आपला अजेंडा स्पष्ट आहे, आपल्याला भाजपच्या विरोधात काम करायचं आहे. असा संवाद कथित व व्हायरल झालेल्या क्लीप मध्ये आहे. दरम्यान संबंधित क्लीपची पुष्टी सरकारनामा करत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.