Ashok Kharat fake captain fraud case update Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Fraud: भोंदू कॅप्टन खरातच्या अडचणीत आजपासून होणार वाढ, संपत्तीच्या चौकशीमुळे खरात पुरता अडकणार?

Investigation into Ashok Kharat property and assets: तुला मुलगाच होईल सांगत गर्भवती महिलेवर भोंदू कॅप्टन खरातने अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात आज पोलिस घेणार कोठडी.

Sampat Devgire

Captain Ashok Kharat in Trouble as Property Probe Begins: भोंदू कॅप्टन अशोक थोरात याला आज पोलीस नव्याने कोर्टात हजर करणार आहेत. खरात याच्या विरोधात ११ गुन्हे दाखल आहेत. यातील महत्त्वाच्या गुन्ह्यात खरात याचा आजपासून तपास होणार आहे.

कॅप्टन खरात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. महिला अत्याचाराच्या तिसऱ्या गुन्ह्यात विशेष तपास पथक आज त्याचा नव्याने ताबा घेऊन तपास करणार आहे.

भोंदू कॅप्टन खरात याच्या विरोधात दाखल दोन गुन्ह्यांमध्ये त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता आणखी काही महिलांनी त्याच्या विरोधात अत्याचाराची तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे. पार्श्वभूमीवर कॅप्टन खरात याच्या विरोधात महत्त्वाच्या तक्रारीचा तपास पोलीसांकडून आजपासून सुरू होईल.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल या तक्रारीत कॅप्टन खरात याने एका गर्भवती महिलेवर अत्याचार केले होते. तुला मुलगाच होईल असे सांगत समोहित करून या महिलेवर अत्याचार झाले. यासंदर्भात संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी तिला पाठिंबा दर्शविल्याने तिने तक्रार करण्याचे धाडस केले.

या तिसऱ्या तक्रारीत कॅप्टन खरात याच्या विरोधात ईशान्येश्वर मंदिरासाठी दबाव टाकून पैसे गोळ्या करण्याचेही प्रकरण आहे. कॅप्टन भोंदू खरात याच्याकडे अमाप संपत्ती आढळली आहे. चाअळीसहून अधिक ठिकाणी त्याने मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या मालमत्तांची ही पोलीस चौकशी करीत आहेत. याबाबत संबंधित महिलेच्या तक्रारीत उल्लेख आहे.

पोलिसांनी कॅप्टन खरात याच्या कार्यालयाचे नुकतीच झडती घेतली. त्यात अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. महिलांवरील अत्याचाराची त्याची कार्यपद्धती या निमित्ताने नव्याने तपासली जाणार आहे. त्यामुळे आजपासून कॅप्टन खरात याच्या अडचणींमध्ये नवी भर पडणार आहे.

भोंदू कॅप्टन खरा याने जमविलेली बेसबी मालमत्ता आणि रोकड याविषयी कुटुंबीयांकडून माहितीची खातरजमा करण्यात येणार आहे. सध्या खरातची पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता आहेत. शनेश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या बँक खात्यासह खरात याच्या वैयक्तिक खात्यांचीही चौकशी निमित्ताने एसआयटी कडून होणार आहे. अद्यापही अनेक मालमत्तांचा तपास आणि माहिती पोलिसांना मिळालेली नाही, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT