Nashik News : भारतीय जनता पार्टी प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विनंतीनुसार राम मंदिराच्या अक्षदा कलक्षाची पूजा नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करणाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंडे फुटले आहे. एका शैक्षणिक संस्थेत धार्मिक कार्यक्रमांना कशी काय परवानगी मिळते, असा प्रश्न काहींनी उपस्थितकेला आहे. याबाबत आता कुलगुरुंचे डोके ठिकाणावर आहे का? या शब्दांत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष संतोष गायधनी यांनी आक्षेप घेतला आहे. (Latest Marathi News)
गायधनी म्हणाले, "सर्वधर्मीय विद्यार्थी ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेत आहेत, त्याच विद्यापीठाच्या प्रांगणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, हे सरळ सरळ शिक्षणाच्या धार्मिकीकरणाचे कृत्य आहे. भारतीय संविधानातील धार्मिक एकात्मतेला आव्हान देणारी ही कृती आहे. आज विद्यापीठाच्या प्रांगणात अक्षदा कलशाची पुजा करण्यास तयार असणारे कुलगुरु भविष्यात हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन धर्मियांचे उरूस, पालख्या, जत्रा उत्सवही असे विनंती अर्ज केल्यावर विद्यापीठाच्या प्रांगणात घेणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी केला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना याचसाठी झाली होती का? असे जात-धर्म अस्मितेचे पायंडे पाडण्याची शैक्षणिक स्थळी खरंच आवश्यकता आहे का? हा नवीन धार्मिक पायंडा यशवंतराव चव्हाणांसारख्या पुरोगामी व्यक्तींच्या नावे असणार्या विद्यापीठात राबवणार्या कुलगुरुंना तातडीने घरचा रस्ता दाखवण्यात यावा, अशी मागणी गायधनी यांनी केली आहे. कुलगुरुंचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न करून त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंचा निषेध केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.