Nashik Politics: नाशिक लोकसभा ठाकरे गटाला सोडण्यात येणार ? शिवसेना नेत्यांनी पवारांची भेट घेतल्याने चर्चा

Sharad Pawar News : महाविकास आघाडीचे नेते पवार यांच्याशी यावेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा झाली.
Sharad Pawar News :
Sharad Pawar News : Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी जिल्ह्याचा दोन वेळा दौरा करावा, त्याचा निवडणुकीसाठी फायदा होईल, अशी विनंती शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी ज्येष्ठ नेते पवार यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान भेट घेऊन केली. (Sharad Pawar's Nashik visit given boost for farmers poltics)

महाविकास आघाडीचे नेते पवार यांच्याशी यावेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा झाली. नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याचे यावेळी संकेत देण्यात आले.

या संदर्भात स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे घटक पक्षांत समन्वय निर्माण करण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. त्याची माहिती आज आम्ही पवार यांना दिली, असे शिवसेना उपनेते सुनील बागुल यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar News :
Madhya Pradesh New CM : नवा चेहरा की शिवराजच ? मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याबाबत आज होणार फैसला!

आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार आहे. यासंदर्भात शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष ही जागा शिंदे गटाला सोडणार की स्वतःच उमेदवार देणार हा गंभीर प्रश्न आहे. याबाबत कोणतीही चर्चा अथवा निर्णय झाल्याचे दिसत नाही. महायुतीच्या घटकांमध्ये तयारी जोरात मात्र, व्यवस्थापन गोंधळात अशी स्थिती आहे.

एकीकडे भारतीय जनता पक्षाने (BJP) विविध बैठका आणि बूथस्तरावर तयारी केलेली आहे. दुसरीकडे नुकतेच शिवसेनेच्या शिंदे गटाने सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक नियुक्त केले आहेत. यामध्ये निवडणूक कोण लढवणार ज्यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटाशी सख्य केले त्यांना उमेदवारी मिळणार की त्यांची संधी हुकणार, हा गंभीर राजकीय प्रश्न आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आजच्या नाशिक दौऱ्यात शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, माजी महापौर वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, शहर प्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका गटनेते विलास शिंदे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ.डी एल कराड तसेच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अन्य पक्षांच्या नेत्यांनीही पवार यांची भेट घेतली. पवार आज कांदा निर्यात बंदीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी शेतकऱ्यांसह चांदवड येथे आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा लोकसभा निवडणुकीच्या राजकीय मांडणीसाठी महत्त्वाचा ठरला आहे.

(Edited by-Ganesh Thombare)

Sharad Pawar News :
Sharad Pawar: कांदा उत्पादकांसाठी शरद पवार रस्त्यावर; चांदवडला आज राष्ट्रवादीचा रास्ता रोको

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com