Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : शिंदे-फडणवीसांच्या जोडीने उद्धव ठाकरेंचा पक्ष पोखरला, उरले फक्त पाच माजी नगरसेवक..

Eknath Shinde and Devendra Fadnavis weaken Uddhav Thackeray's party in Nashik, only five ex-corporators remain : आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजपने मिळून उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्णपणे पोखरला आहे. आता गत निवडणुकीत निवडून आलेले केवळ पाच नगरसेवक पक्षात उरले आहेत.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजपने मिळून उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्णपणे पोखरला आहे. मागील निवडणुकीत उद्धव सेनेचे 35 नगरसेवक निवडून आले होते. आता गत निवडणुकीत निवडून आलेले केवळ पाच नगरसेवक पक्षात उरले आहेत. यात सर्वांधिक 26 नगरसेवक शिंदेंनी फोडले आहेत.

लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला नाशिकमध्ये चांगले यश मिळाले. नाशिकमध्ये उद्धव सेनेचे राजाभाऊ वाजे खासदार झाले. मात्र विधानसभा निवडणुकीत उद्धव सेनेसह महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. त्यानंतर पक्षाला मोठी गळती सुरु झाली. सत्ताधारी पक्षात राहणे सोयीस्कर वाटू लागल्याने शिवसेना(शिंदे गट) व भाजपकडे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते एक-एक करुन प्रवेश करु लागले. पक्षाच्या अनेक मात्तबर नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने उबाठा पक्ष खिळखिळा झाला आहे.

रविवारी उबाठाचे महानगप्रमुख विलास शिंदे यांनी 8 माजी नगरसेवकांसह शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला. शिंदे यांच्या प्रवेशानंतर आता गत निवडणुकीत निवडून आलेले फक्त पाच माजी नगरसेवक पक्षात उरले आहेत. त्यात डी.जी. सूर्यवंशी, केशव पोरजे, सुनीता कोठावळे, मंगला आढाव व प्रशांत दिवे यांचा समावेश आहे.

उद्धव सेनेला खऱ्या अर्थाने सुरुंग लावला तो एकनाथ शिंदे यांनी, गेल्या अडीच वर्षात 25 माजी नगरसेवक, एक जिल्हाध्यक्ष, एक महानगरप्रमुख फोडून शिंदे यांनी आपल्या पक्षात दाखल केले. उद्धव सेनेच्या 3 माजी नगरसेवकांचे निधन झालेले आहे. तर 2 माजी नगरसेवक भाजपात गेले आहेत. त्यामुळे शिवसेना(शिंदे) पक्षाची ताकद नाशिकमध्ये वाढली आहे.

पक्षातील गळती रोखण्यासाठी संजय राऊत व स्वत: उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी नाशिकमध्ये मोठे शिबीरही घेतले होते. कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु सत्तेच्या ओढीने पक्षासोबत वर्षानुवर्ष जे सोबत होते अशांनीही एक-एक करुन उद्धव ठाकरे यांची साथ सोडली.

पक्षाने हे दिलं नाही ते दिलं नाही अशी कारणे पुढे करत आपल्या भविष्यातील राजकीय सोयीसाठी माजी नगरसेवक व पदाधिकारी पक्ष सोडताना दिसत आहे. त्यामुळे पक्षात जे कोणी उरले आहेत त्यांचेही मनोधैर्य ढासळताना दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण सत्ताधाऱ्यांच्या दिशेने फिरु लागलं आहे. नाशिकचं राजकारण पुढे आणखी काय -काय वळण घेतं हे पाहावं लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT