Kunal Patil : राहुल गांधीना धक्का, 700 कार्यकर्त्यांसह कुणाल पाटील भाजपमध्ये चालले ; प्रवेशाची तारीख ठरली..

Congress leader Kunal Patil joins BJP, major blow to Rahul Gandhi as 700 workers shift allegiance : पाटील घराणं हे कॉंग्रेसशी एकनिष्ठ व अत्यंत जवळचे घराणे मानले जाते. कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेससोबत होते.
Kunal Patil Congress
Kunal Patil CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला खिळखिळा करण्याचे काम भाजपने सुरु केले आहे. उद्धव सेनेतील अनेक मात्तबर नेत्यांना गळाला लावण्याचे काम भाजप करत असून भाजपला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. 70 वर्षांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या धुळ्यातील पाटील घराण्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या गळाला लागले आहेत.

आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे. मंगळवारी (दि. १) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात ते प्रवेश करणार आहेत. यासाठी धुळ्यातून सोमवारी तब्बल ७०० कार्यकर्ते मुंबईकडे निघणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला खान्देशात मोठे खिंडार पडणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिकच जोर आला. मात्र पाटील यांनी त्यासंदर्भात अधिकृत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नव्हती. मात्र भाजप प्रवेशाबाबत शनिवारी त्यांनी धुळ्यात समर्थकांचा मेळावा घेतला त्यावेळी आपण भाजपत प्रवेश नेमका कधी करणार हे आपण रविवारी जाहीर करू असे त्यांनी सांगितले होते.

Kunal Patil Congress
Chhagan Bhujbal fake news : मंत्री भुजबळांच्या मृत्यूची खोटी पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल; सायबर पोलिस गुन्हेगारांच्या मागावर

त्यानुसार रविवारी नाशिक येथे त्यांनी आपला भाजप प्रवेश मंगळवारी होणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात दुपारी ०२:०० वाजता मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटील यांचा भाजप प्रवेश होणार आहे. कोणताही शब्द, आश्वासन न घेता मी भाजपत जात आहे असं कुणाल पाटील यांनी म्हटलं आहे.

Kunal Patil Congress
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!

पाटील घराणं हे कॉंग्रेसशी एकनिष्ठ व अत्यंत जवळचे घराणे मानले जाते. कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेससोबत होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी रोहिदास पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. शिवाय कुणाल पाटील यांचेही राहुल गांधी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे कुणाल पाटील यांचे भाजपत जाणे हा राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसला मोठा धक्का आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com