Balasaheb Thorat aggressive over rail project issue Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat: रेल्वे मंत्र्यांच्या निर्णयावर संताप...बाळासाहेब थोरात नाशिक- पुणे रेल्वे साठी पुन्हा झाले आक्रमक!

Balasaheb Thorat on Pune Nashik railway route controversy: नाशिक- पुणे हा निकडीचा रेल्वे मार्ग असताना अचनाक तो लांबणीवर पडल्याने अहिल्यानगरच्या कोणत्या मंत्र्याला तो खूपतोय याची चर्चा.

Sampat Devgire

Pune Nashik Rail Project: नाशिक पुणे रेल्वे मार्ग व्हावा यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांना हा मार्ग खूपतो आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्र्यांनी नाशिक शिर्डी मार्गाची घोषणा केल्याने नवा वाद उफाळला आहे.

नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग औद्योगिक आणि प्रवासी अशा दोन्ही दृष्टीने निकडीचा आहे. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी घोषणा देखील केली होती. अहिल्यानगरच्या काही मंत्र्यांचे राजकीय हितसंबंध त्यात आडवे आल्याची जोरदार चर्चा सुरूआहे.

कोणतीही मागणी नसताना रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांनी नाशिक शिर्डी मार्ग होणार अशी घोषणा केली आहे. भाजप सरकारची ही घोषणा ही केंद्र सरकारलाही अडचणीत आणण्याची शक्यता आहे. प्रश्नावर आता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात या विषयावर चांगलेच आक्रमक झाले आहे. नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग अत्यंत निकडीचा आणि प्राधान्यक्रम देण्याचा विषय आहे. यामध्ये शिर्डी आली कुठून?. शिर्डीसाठी स्वतंत्र विचार करता येऊ शकतो, असे थोरात यांनी सांगितले.

नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम यापूर्वी करण्यात आले होते. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने त्याची घोषणा देखील केली. कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार अशी अशा निर्माण झाली होती.

नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचे तसेच अन्य मुलभूत कामांना देखील सुरवात करण्यात आली होती. त्यावर शासनाने सुमारे 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. असे असताना या खर्चाचा आणि तयारीचा विचार न करता रेल्वेमंत्र्यांनी अचानक शिर्डीचा विषय काढलाच कसा? असा संताप्त सवाल थोरात यांनी केला.

नाशिक- संगमनेर- चाकण आणि पुणे हा रेल्वे मार्ग औद्योगिक आणि व्यावसायिकदृष्ट्या निकडीचा आहे. प्रवासी वाहतूक देखील या मार्गाने मोठ्या प्रमाणावर होते. विविध संस्था आणि संघटना या मार्गासाठी आग्रही आहेत. आता कोणाची राजकीय सोय म्हणून लाखो प्रवासी आणि नागरिकांची गैरसोय करण्याचे काम होत आहे? असा प्रश्न थोरात यांनी केला.

विविध संघटना संस्था आणि नागरिकांनी पुन्हा एकदा या प्रश्नावर आंदोलन करण्याची तयारी केली पाहिजे. हा विषय प्राधान्याचा असल्याने त्यावर शांत बसून चालणार नाही. त्याचा पाठपुरावा करावाच लागेल असा इशारा थोरात यांनी दिला आहे. त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग पुन्हा एकदा नागरिकांच्या दृष्टीने आंदोलनाचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT