Gunaratna Sadawarte : गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांना वॉर्निंग : काय आहे प्रकरण?

Gunaratna Sadawarte : महायुती सरकारच्या मदतीला नेहमीच धावून येणारे ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी आता झोपडपट्टी कारवाईच्या प्रश्नावर आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे
Adv Gunwant Sadawarte
Adv Gunwant SadawarteSarkarnama
Published on
Updated on

Uday Samant News : महायुती सरकारच्या मदतीला नेहमीच धावून येणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते आता महायुतीच्याच मंत्र्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे. आपल्या स्टाईलमध्ये मंत्री उदय सामंत यांना दिलेले त्यांचे आव्हान चर्चेचा विषय ठरले आहे.

नाशिक आणि सिन्नर येथील अतिक्रमण कारवाईच्या विरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट नाशिकचा दौरा केला. यावेळी महापालिका आणि एमआयडीसीच्या प्रशासनाला धारेवर धरले. अंबडच्या शांतीनगर झोपडपट्टीवासियांना तातडीने पुन्हा घरे देण्याची मागणी केली. 

यावेळी ॲड. सदावर्ते यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये डोळे वटारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वार्निंग देऊन टाकली. उद्योग मंत्री उदय सामंत यांना आपल्या खास शैलीत चांगलेच दमात घेतले. "माझा इशारा साधा समजू नका, तुम्हाला किंमत मोजावी लागेल", असे ते म्हणाले.

Adv Gunwant Sadawarte
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

उद्योग मंत्री सामंत यांना ॲड. सदावर्ते यांनी चांगलेच धारेवर धरले. "सामंत मंत्री झाले तेव्हा सरकारने त्यांना बंगला दिला नव्हता. त्यावर सामंत यांनी किती थयथयाट केला. रोज सकाळी उठल्यावर मला किती त्रास होतो. सह्याद्री विश्रामगृहात लोकांना बोलवावे लागते. मला बंगला द्या, बंगला द्या" असे सामंत रोज बोलत सुटले होते. 

Adv Gunwant Sadawarte
Shivsena Vs NCP: महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीबाबत नको ते बोलून गेले; एकनाथ शिंदेंच्या फोननंतर मंत्री शिरसाटांनी कानाला लावला खडा

"मंत्री म्हणून बंगला मिळाला नाही, तेव्हा तुम्ही किती थयथयाट केला. गोरगरिबांची घरे उध्वस्त केली. त्यांच्या घरावर बुलडोझर चालवला. बेकायदेशीर कारवाई केली, त्याचे काहीच वाटले नाही का? असा प्रश्न ॲड. सदावर्ते यांनी केला. 

"उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण साधे समजू नये. याबाबतची सर्व अधिकृत कागदपत्र आपल्याकडे आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्र्याला कोर्टात याचा जाब द्यावा लागेल. तेव्हा तुमचे काय होईल, याचा विचार केला आहे का? असा प्रश्न सदावर्ते यांनी केला. 

नाशिकच्या शांतीनगर येथील घरांवर आणि दलितांना उद्ध्वस्त करताना तुम्हाला आचारसंहिता आडवी आली नाही. मग या बेकायदेशीर कारवाईचे पुनर्वसन करताना आचारसंहिता कशी आडवी येते? या दलित आणि गरीब समाजाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. उद्योग मंत्री सामंत आणि त्यांच्या सर्व यंत्रणांना याचा जबाब द्यावाच लागेल, असा इशारा त्यांनी दिला. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com