Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: मुख्यमंत्री म्हणतात मी शेतकरी, मग कांदा प्रश्न सोडवा!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) राज्याचे मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणतात मी शेतकरी (Farmers) आहे. शेती करतो. माध्यमातून त्यांनी असे सांगितलेले आपण वाचतो. मग आता कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. त्यांचा प्रश्न सोडवा ना? पंतप्रधान मोदी साहेबांशी (Narendra Modi) या विषयावर बोला, या शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य शासनाला कोंडीत पकडले.(Chhagan Bhujbal question to state government on Onion growers issue)

कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. भाव गडगडल्याने ते संकटात सापडले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींवर देखील दबाव आहे. त्यामुळे नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी आज विधीमंडळात या प्रश्नावर आवाज उठवला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

यासंदर्भात विधानसभेत श्री. भुजबळ यांनी सरकारचे लक्ष वेधले. ते अतिशय आक्रमक झालेले दिसले. ते म्हणाले, कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःच्या खीशातून खर्चापोटी 318 रुपये द्यावे लागले. आपले मुख्यमंत्री शेतकरी आहेत. अनेकदा माध्यमांतून दिसते, ते सांगतात, मी शेतकरी आहे. शेती करतो. अनेक मंत्री आहे. ही सगळी शेतकरी मंडळी आहेत. मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते काही करणार आहे का?.

मी स्वतः उपमुख्यमंत्री होतो, तेव्हा तीनशे कोटी रुपये खर्च करून सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला होता. याबाबत राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे. कांदा उत्पादक शेतकरी अतिशय गरीब वर्गातील शेतकरी असतो.

जे काही वर्तमानपत्रांतून येते आहे, तुर्कस्तान, पाकीस्तान, कझागीस्तान, युक्रेन, मोरक्को, बेलारूस या देशांत कांदा पिकाला प्रचंड दर आहेत. कांद्याचा तुटवडा आहे. जर हा कांदा निर्यात केला तर त्याला चांगला भाव मिळेल. मात्र निर्यातीला भाव दिला पाहिजे. नाफेडने त्यात सहभाग घेतला पाहिजे. नाफेडने त्यात सहभाग घेतला तर कांदा दर वाढण्यास चालना मिळेल.

आपल्याकडे कांदा दर वाढले की, केंद्र सरकार कांदा निर्यात बंद करते. व्यापारी म्हणतात, दराचा काही भरोसा नाही. आम्ही कांदा घ्यायचा आणि त्याच वेळेला निर्यात बंद व्हायची. त्यामुळे व्यापारी देखील कांदा खरेदीसाठी संपर्क करीत नाही. त्यासाठी ते नकार देतात.

केंद्राच्या धोरणामुळे या व्यवसायात सातत्य नसते. भाव वाढला की, लगेच सरकार निर्यात बंद करते. इतर देशांतून कांदा आयात करते. द्राक्षांबाबत देखील हीच स्थिती आहे. बांगलादेशमध्ये द्राक्षांवर प्रचंड ड्यूटी वाढवली आहे. त्यामुळे तिकडे देखील द्राक्ष जात नाहीत.

आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जर देशाच्या पंतप्रधानांशी बोलले, तर ते बांगलादेशच्या पंतप्रधानांशी बोलू शकतील. त्यामुळे त्यांनी ताबडतोब दिल्लीश्वरांशी बोलून घ्यावे. कांदा वाहतूकीसाठी रॅक देण्यासाठी कोटा सिस्टीम आहे. हे प्रश्न राज्य सरकारने सोडवावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT