Nashik Dargah, Harshwardhan Sapkal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Riots Police Controversy: नाशिक दंगलीत चोर सोडून संन्याशाला फाशी...; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Harshvardhan Sapkal Criticizes Nashik Police : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात विविध ठिकाणी सद्भावना यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातील वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न होत असून समाजातील सद्भावना आणि सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

Sampat Devgire

Political Reaction Nashik Violence: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात विविध ठिकाणी सद्भावना यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातील वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न होत असून समाजातील सद्भावना आणि सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

नाशिकमध्ये (Nashik) वादग्रस्त सात पीर दर्गा पाडण्यात आला. त्यावरून पोलिस, राज्य शासन आणि नागरिकांमधील वातावरण बिघडले. त्यामुळे नाशिकमध्ये येऊन सद्भावना यात्रा काढावी लागली. बीड परळी आणि अन्य काही ठिकाणी देखील आम्ही जाणार आहोत, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Nashik Dargah controversy

नाशिक शहरात काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी (ता.29) सायंकाळी सद्भावना यात्रा काढण्यात आली. या यात्रेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रदेशाध्यक्ष सपकाळ स्वतः सहभागी झाल्याने ही यात्रा चर्चेचा विषय बनली.

नुकत्याच झालेल्या दंगली संदर्भात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यामध्ये पोलिसांनी दीड हजाराहून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल केलेत. पोलिसांच्या कारवाईवर सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केला. पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही, असा ठपका त्यांनी ठेवला.

जे लोक मदतीला गेले त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजू आहेत. पोलिसांनी मात्र चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने करावा. लागला तरी चालेल मात्र खऱ्या गुन्हेगारांना शोधून काढावे. निरपराध कार्यकर्त्यांना उगीचच दंगलीत होऊ नये, असंही ते यावेळी म्हणाले.

तर नाशिकमध्ये पोलिसांवरही हल्ला झाला होता. त्यामुळे शहरात तणाव होता. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. मी देखील समर्थन करीत नाही. मात्र या प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्या सहभाग नव्हता त्यांची नावे व वगळली पाहिजे या घटनेत मोठा घटनाक्रम आहे. विविध टप्पे आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठी नाराजी आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण करण्यात येणारे वातावरण चुकीचे आहे, असे सांगितले. धर्म आणि जातीत भेदभाव निर्माण करण्याची शिकवण महाराष्ट्राची नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे महाराष्ट्र धर्माला आणि सामाजिक एकोप्याला तडा जाईल तिथे काँग्रेस ठामपणे उभी राहील.

सर्व समाजांमध्ये एकोपा आणि संवाद टिकला पाहिजे. तो टिकला नाही तर ते शत्रूचे यश आहे आणि आपले अपयश ठरेल. त्यामुळे परळी सह राज्यात जिथे जिथे अशा घटना घडतील तिथे काँग्रेस सद्भावना यात्रा काढणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT