Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंच्या कारला दुचाकीची जोरदार धडक; अपघातानंतर वाद अन् रिक्षाचालकांची मध्यस्ती, नेमकं काय घडलं?

Raosaheb Danve's Car Accident : भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका दुचाकीस्वाराने दानवे यांच्या कारला जोरदार धडक दिल्यामुळे ही अपघाताची घटना घडली आहे.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 30 Apr : भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका दुचाकीस्वाराने दानवे यांच्या कारला जोरदार धडक दिल्यामुळे ही अपघाताची घटना घडली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर दुचाकीस्वार आणि रावसाहेब दानवे यांच्यात वादही झाला. अपघातानंतर दुचाकीस्वाराने दानवे यांच्याशी हुज्जत घातल्याचं सांगितलं जात आहे. तर या अपघातानंतर लोणावळा बाजारपेठेतील सीसीटीव्ही बंद असल्याचंही उघडकीस आलं आहे.

Raosaheb Danve
Radhakrishna Vikhe Patil fraud case : मोठी बातमी; भाजप मंत्री विखेंसह 54 जणांविरोधात '420'चा गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते रावसाहेब दानवे हे काही कामानिमित्त लोणावळ्यातील बाजारपेठेत कारने आले होते. यावेळी एका दुचाकीने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकी स्वाराने दानवेंशी हुज्जत घालायला सुरूवात केली. यावेळी स्थानिक रिक्षा चालकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.

या अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता या पेठेतील कॅमेरे बंद असल्याचं उघडकीस आलं आहे. मात्र, लोणावळा बाजारपेठेतील सीसीटीव्ही यंत्रणा ठप्प असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Raosaheb Danve
Pahalgam Attack Conspiracy : पहलगाम हल्ला मोदी-शहांचा कट म्हणणाऱ्या आमदारासह 27 जणांना अटक

भविष्यात आणखी एखादी गंभीर घटना घडल्यास पुरावा म्हणून ज्या सीसीटीव्हीचा आधार घेतला जातो. तेच बंद असतील तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com