Manisha Khatri Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manisha Khatri: नाशिकमधील रस्त्यांच्या कामात त्रुटी दाखवा, नाव बदलून टाकेन... महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांचे ओपन चॅलेंज

Nashik Kumbh Mela: नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांवर टीका होत असताना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी गुणवत्ता सिद्ध करण्याचे आव्हान देत स्पष्ट भूमिका मांडली.

सरकारनामा ब्यूरो

Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. या रस्त्यांच्या गुणवत्तेवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यावरूनच विरोधीपक्षांना टीकेसाठी मुख्य विषय मिळाला आहे. यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि विरोधकांकडून रस्त्यांच्या कामांवर टीका केली जात आहे. कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न राजकीय अजेंड्यावर आला आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत महापालिका आयुक्तांनी विविध ठिकाणी थेट भेटी देऊन कामाची तपासणी केली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील वेदमंदिर भागातील संशयास्पद वाटणारा रस्ता थेट जेसीबीने तोडण्यात आला होता. त्यामुळे कंत्राटदारांच्या मनात धडकी भरली होती.

सोशल मिडीयावरील टीकेला उत्तर

शहरात विविध भागात रस्त्यांची कामे सुरु असून नाशिकच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत टीका करणाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. विशेषत: सोशल मीडियावरील चर्चेला त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. याबाबतच्या निविदांची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामुळे महापालिकेचे काम अत्यंत पारदर्शी आहे.

रस्त्यांची गुणवत्ता तपासणी सुरु

रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत त्रिस्तरीय गुणवत्ता तपासणी केली जात आहे. मुंबईच्या आयआयटी पथकाकडून या रस्त्यांची नुकतीच गुणवत्ता तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान रस्त्यांच्या काँक्रीटचा टिकाऊपणा 40 ग्रेड अपेक्षित असताना तो 60 ते 80 टक्के आढळला. त्यामुळे आयआयटीच्या पथकाने प्रशासनाचे कौतुक केले. मुंबईच्या आयआयटीच्या मंजुरीनंतरच रस्त्यांच्या कामाची देयके मंजूर केली जाणार आहेत.

"मी नाव बदलून टाकेल"

रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत टीका करणाऱ्यांना आयुक्त खत्री यांनी थेट आव्हान दिले आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या गुणवत्तेमध्ये कोणत्याही त्रुटी अथवा टिकाऊपणामध्ये कमतरता नाही. त्रुटी आढळल्यास "मी नाव बदलून टाकेल" असे आव्हानच त्यांनी दिले आहे. महापालिका आयुक्तांनी पहिल्यांदाच एवढ्या स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. राजकीय टीकाकारांबरोबरच सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनाही त्यांनी हे आव्हान दिले आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामाबाबत आयुक्तांच्या भूमिकेमुळे प्रशासनाचाही आत्मविश्वास वाढण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT