Swami Someshwaranand & Swami Avimukteshwaranand Sarswati Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela Politics: हट्टच न सोडणाऱ्या महाजनांशी लढण्यासाठी शंकराचार्य आणि साधुसंतही उतरले तपोवनात! खडे बोल सुनावत म्हणाले, झाडे तोडून कसले कुंभ स्नान....

Nashik-Shankaracharya-and-saints-also-took-a-stand-against-tree-Cutting-in-Tapovana-and-BJP-Leader-Girish-Mahajan-शंकराचार्य आणि साधुसंतांचा संताप, झाडे तोडून कुंभ स्नान करणे हे कसले धर्माचे प्रतीक, कुंभ मेळ्याच्या आडून सरकारने आपला अजेंडा राबवू नये

Sampat Devgire

Kumbh Mela News: साधू ग्राम उभारणीसाठी तपोवन आतील १७०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तसा हट्टच धरला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

साधू ग्राम येथील झाडे तोडण्यास राजकीय पक्ष आणि पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना वृक्षतोडीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसह विविध राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. राजकीय नेते आणि त्यांचे आंदोलन जोरात आहे. आता त्यात शंकराचार्य आणि साधूंनी उडी घेतली आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रश्नावर सरकारला खडे बोल सुनावले आहेत. झाडे तोडून कुंभमेळा साजरा करणे हे कोणत्या तत्त्वात बसते. कोणते साधू झाडे तोडून स्नान करणे पसंत करतील? कोणत्या धर्मात हे वसते? असा प्रश्न त्यांनी केला.

वृक्षतोडी विषयी शासनाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. कुंभमेळ्याचे केवळ निमित्त आहे. राजकीय नेत्यांचा झाडे तोडण्याचा उद्देश वेगळ्याच असावा. कुंभमेळा झाल्यावर ही जमीन एखाद्या योजनेसाठी किंवा सरकारच्या आवडत्या व्यक्तीला बहाल करण्यात येईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

नाशिकचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनीही वृक्षतोडीविषयी नापसंती व्यक्त केली आहे. प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड करणे अयोग्य आहे. ते धर्मात देखील बसत नाही. साधून नाही ते आवडणार नाही. कुंभमेळा सुरक्षित आणि आनंदी पार पडावा यासाठी वृक्षतोडीचा निर्णय स्थगित करावा असे आवाहन त्यांनी केले.

राजकीय नेते आणि पर्यावरण प्रेमी तसेच विविध संघटनांनी हा विषय उचलून धरला आहे. रोज होणाऱ्या आंदोलनामुळे प्रशासन दबावाखाली आहे. त्यातच साधूनही विरोध केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT